फिफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेनिमित्ताने देशदूततर्फे जळगावात चार ठिकाणी सेल्फी

0
जळगाव |  प्रतिनिधी  :  सतरा वर्षाखालील फुटबॉलपटूंसाठी फीफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धेचे भारतात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसह फुटबॉल क्रीडा प्रकाराचा प्रचार व प्रसार व्हावा यासाठी दै.‘देशदूत’, रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राईट फाऊंडेशन, विनोद इंजिनिअरींग, डायकन प्रायोजित जळगावात चार ठिकाणी सेल्फी पॉईंट तयार करण्यात येत आहे. सेल्फी पॉईंटचे उद्घाटन दि.१६ रोजी होणार आहे.

फीफा वर्ल्डकप फुटबॉल स्पर्धा दि. १० ते २४ ऑक्टाबर दरम्यान दिल्ली, कोलकाता, गोवा, मुंबई व गुवाहटीतील मैदानावर होणार आहे. त्यामुळे आतापासूनच देशभरात फुटबॉलचा फिवर सुरु आहे. राज्यातही शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे ‘अवघा महाराष्ट्र फुटबॉलमय’ उपक्रम राबविण्यात येत आहे.

त्याअनुषंगाने प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी दै.‘देशदूत’, रोटरी क्लब ऑफ जळगाव ईस्ट, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आणि राईट फाऊंडेशन, विनोद इंजिनिअरींग, डायकन प्रायोजित जळगावात जिल्हा क्रीडा संकुल, मू.जे. महाविद्यालय, काव्यरत्नावली चौक आणि टॉवर चौकात सेल्फी पॉईंट तयार करण्यात येत आहे.

सेल्पी पॉईंटचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत दि.१६ रोजी करण्यात येणार आहे. क्रीडापटू आणि क्रीडा रसिकांनी सेल्फी पॉईंटला जावून काढलेले सेल्फी दै.‘देशदूत’मध्ये प्रसिध्द करण्यात येणार आहे

सेल्फी पॉईंटला जावून सेल्फी काढावी, असे आवाहन दै.‘देशदूत’ व रोटरी क्लब जळगाव ईस्टतर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*