फसवणूक करणार्‍या केळी व्यापार्‍यास पोलीस कोठडी

0
यावल, |  प्रतिनिधी : तालुक्यातील सातोद व कोळवद येथील शेतकर्‍यांची केळी घेवुन पैसे न देता फसवणूक केल्या प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील दुसरा संशयीत जयवंत प्रल्हाद ङ्गिरके (रा. कोळवद) यास शुक्रवारी पोलिसांनी अटक केली.

त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला सहा दिवसाची दि. १९ जुलै पर्यंतची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यातील मुख्य संशयीत बाळु साळी याने यापुर्वीच अटकपुर्व जामिन घेतला आहे.

केळी उत्पादकांकडून केळी खरेदी करण्याचा बाजार समीतीचा परवाना नसतांना सावदा येथील राजलक्ष्मी केला एजन्सीचे संचालक बाळु पुंडलीक साळी व कोळवद येथील जयवंत प्रल्हाद ङ्गिरके या दोघांनी १० मार्च १६ ते मे १६ या कालावधित तालुक्यातील सातोद व कोळवद येथील सात केळी उत्पादकांकडील केळी खरेदी करून त्यांची १८ लाख रुपयांची ङ्गसवणूक केल्याचा गुन्हा बाजार समितीचे सचिव स्वप्निल सोनवणे यांच्या ङ्गिर्यादी वरून ३ एप्रिल रोजी यावल पोलिसात दाखल करण्यात आला होता

तेव्हा पासुन दोघं संशयीत ङ्गरार होते तेव्हा या तील मुख्य संशयीत बाळु साळी यांनी औरंगाबाद खंडपिठातुन अटकपुर्व जामीन मिळवला होता तर या गुन्ह्यातील दुसरा संयशीत जयवंत ङ्गिरके यास शुक्रवारी पोलिसांनी अटक केली तर येथील प्रथमवर्ग न्यायधिश डी.जी. जगताप यांच्या न्यायालया समोर हजर केले असता त्यास सहा दिवसाची दि. १९ जुलै पर्यंतची पोलिस कोठडी सुनावन्यात आली आहे

१७ लाख ९९ हजाराची फसवणूक

सातोद व कोळवद येथील सात शेतकर्‍यांकडून बाळु साळी या व्यापार्‍याने स्थानिक केळी एजंट जयवंत ङ्गिरकेच्या मदतीने १७ लाख ९९ हजार २२३ रुपयांची केळी घेतली व पैसे न देता फसवणूक केली आहे. लुबाडलेल्या शेतकर्‍यांना आता पैसे कधी मिळणार? असा प्रश्न पडला आहे.

LEAVE A REPLY

*