जळगाव जिल्ह्यात वादळीवार्‍यासह गारपीट : वीज पडून दोघांचा मृत्य

0
जळगाव | देशदूत चमुकडून : आज सकाळपासून उन्हाचा कडका जाणवत असतांना सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वातावरणात बदल होत जोरदार वादळीवार्‍यासह पाऊसास सुरवात झाली. पावसासोबतच गारपीटही झाली.

जिल्ह्यातील अडावद, चिंचांली, किनगाव, धानोरा, डांभूर्णीसह जळगाव शहरात सायंकाळी पाच वाजेपासून
वादळी वार्‍यास सुरवात झाली.

दरम्यान खेडगाव ता. चाळीसगाव येथे पितांबर हिरामण सुर्यवंशी वय  १८ या मुलावर वीज पडून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच बबलू सतीलाल भिल वय २२  पिलखोड याचा पिंप्री ता. चाळीसगाव येथे वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

वीस ते पंचवीस मिनीट पावसास सुरवात होत जोरदारपणे गारा पडल्यात यामुळे अनेकांची धावपळ उडाली.

LEAVE A REPLY

*