प्राप्त तक्रारींनुसार गुन्हे दाखल कराच – लोहमार्ग पोलीस अधीक्षक अमोध गावकर

0
भुसावळ |  प्रतिनिधी  : लोहमार्ग पोलिसात प्रवाश्यांकडून येणार्‍या तक्रारींची संख्या वाढती असली तरी प्राप्त होणार्‍या संपूर्ण तक्रारी, गुन्ह्याची नोंद करा. कुठाल्याही तक्रारीला नाकारु नका, अशा सुचना लोहमार्ग पोलिस (नागपूर) अधीक्षक अमोघ गावकर यांनी लोहमार्ग पलिसांना दिल्या.

येथील लोहमार्ग पोलिस स्थानकाच्या वार्षिक निरीक्षणासाठी ते आले होते यावेळी कर्मचार्‍यांशी मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी लोहमार्ग उपविभागीय पोलिस अधिकारी (मनमाड) गौतम पवार, प्रभारी अधिकारी एपीआय उज्वल पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी, त्यांनी स्थानकाचा वार्षिक आढावा घेतला.विविध गुन्ह्यांबाबत मार्गदर्शनकरुन तपास,अट्टल गुन्हेगारांची तपासणी, पायबंद घालण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याबाबात सुचना दिल्या.पो.स्टे. व क्वॉर्टर परिसरात स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला.

पोस्टेमध्ये विविध गुन्ह्यात तसेच आरोपींकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल पडून आहे. तो कायदेशीर पद्धतीने फिर्यादींना ताबडतोब परत करण्याबाबत सुचना दिल्या. तसेच शस्त्रास्त्र साठ्याची तपासणी करुन माहिती घेतली.

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये पेट्रोलिग सुरु करण्यात आली आहे. हरवलेल्या व घरुन निघुन आलेल्या मुलांच्या शोधासाठी‘ऑपरेशन मुस्कान’वर जोर देण्यात आला आहे.

तसेच पोलिस वेल्फेअर (कल्याणकारी योजना) संबंधी माहिती दिली.कर्मचार्‍यांच्या विविध प्रश्‍नांसंबंधी दरबार घेऊन कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या.

LEAVE A REPLY

*