मुख्यमंत्र्यांना शेतकर्‍यांची पॉलिसीच कळत नाही

0
जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-शेतकरी कर्जमाफीबाबत फडणवीस सरकारने मृगजळासारखी परीस्थीती निर्माण केली असुन त्यांना पॉलीसीच कळत नसल्याची टिका काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी आज येथे केली.
दरम्यान अनुभवी असलेल्या मुक्ताईनगरवासियांचा त्यांनी सल्ला घ्यावा असा टोलाही त्यांनी लगावला.
प्रदेश काँग्रेस कमेटीतर्फे ‘फसणवीस सरकारची फसवी कर्जमाफी’ हे अभियान राबविले जाणार असुन त्यादृष्टीने आज जिल्हा काँग्रेस कमेटीची बैठक काँग्रेस भवनात पार पडली. यावेळी ते बोलत होते.

बैठकीत बोलतांना प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील पुढे म्हणाले की, काँग्रेसच्या दबावामुळेच शेतकर्‍यांची कर्जमाफी झाली. कर्जमाफीपुुर्वी शेतकर्‍यांना 10 हजार रूपये देण्याची घोषणा महसुलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

परंतु प्रत्यक्षात शेतकर्‍याला 10 रूपयेही मिळाले नाही. आज शेतकर्‍यावर तिबार पेरणीचे संकट उभे राहीले आहे. सरकार मात्र शेतकर्‍यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करू पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला.

राज्य बँकेकडे असलेल्या पैशांची उचलही राज्य सरकारने केली नाही. मुळात फडणवीस यांना पॉलीसीच कळत नाही. आणि ज्यांना कळते त्या मुक्ताईनगरवासियांना घरी बसवून ठेवले आहे.

त्यांनी अनुभवी असलेल्या मुक्ताईनगरवासियांचा सल्ला घ्यायला हवा असा टोलाही डॉ. उल्हास पाटील यांनी लगावला.

शिवसेनेसह महाजनांवरही टिका
काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उल्हास पाटील यांनी शिवसेनेच्या आंदोलनाचाही समाचार घेतला. जिल्हा बँकेसमोर ढोल वाजविण्यापेक्षा मंत्रीमंडळासमोर ढोल वाजवावे असे त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील मोठे मंत्री असलेले आणि मुख्यमंत्र्यांच्या मागे फिरणार्‍यांकडुन सिंचनाची एकही कामे झालेली नसल्याचे सांगून ना. गिरीष महाजन यांच्यावरही डॉ. पाटील यांनी निशाणा साधला. जीएसटीला आता व्यापार्‍यांचा विरोध वाढू लागला आहे. ग्रामीण भागातील जनताही आता भाजपा सरकारला कंटाळली असुन पुढील सत्ता ही काँग्रेसचीच येणार असल्याने कार्यकर्त्यांनी प्रदेशकडुन आलेल्या प्रत्येक कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी असे आवाहनही डॉ. उल्हास पाटील यांनी शेवटी केले.

 

LEAVE A REPLY

*