सामरोदला घराची भिंत पडून बालिकेचा मृत्यू

0
सामरोद, ता.जामनेर । दि.14 । वार्ताहर-येथे दि. 14 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास एका 4 वर्षीय चिमुकलीच्या अंगावर घराची भिंत पडून तिचा मृत्यू झालास. या घटनेमुळे सामरोदवर शोककळा पसरली आहे.
सामरोद येथील अशोक भावडू वखरे यांच्या घराची भिंत दुपारी 2 वाजता अचानक पडली. या भिंती खाली लावण्या विकास वखरे हि चार वर्षीय चिमुकली भिंती जवळ होती.
त्यामुळे ती भिंती खाली दाबली गेली. तिच्या मेंदूला जबर मार लागल्यामुळे तिच्या नाका कानातुन रक्तस्त्राव होवू लागला तिला तातडीने जामनेर येथे उपचाराला नेत असतांना वाटेतच तिचा मृत्यू झाला तिला जामनेर येथे उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

शविविच्छेदना नंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. त्यांचा पुतण्या विकास लक्ष्मण वखरे यांची मुलगी आहे. हे काके-पुतणे शेजारी राहतात.

लावण्या भिंत पडण्या अगोदर झोपलेली होती. झोपेतून उठल्यावर ती घराबाहेर निघाली अन भिंतीजवळ जाताच भिंत कोसळली व ती भिंती खाली दाबली गेली.

लावण्या भिती खाली दाबली गेली तेव्हा तिची आई घरी होती व वडील विकास वखरे शेळ्या चारण्यासाठी जंगलात गेले होते. विकास वखरे यांना दोन मुली आहेत.

लावण्या ही लहान होती. सकाळी 4 वाजेपासुन 7 वाजेपर्यंत पाऊस सुरु होता. भिंत मातीची असल्यामुळे ती पावसाने ओली होवून पडली. तहसिल विभागाला घटनेची माहिती कळताच तलाठी सचिन जाधव यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला.

 

LEAVE A REPLY

*