Type to search

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

आरएसएसकडून बहुजनांना मागे ठेवण्याचे काम!

Share

जळगाव । दि.23 । प्रतिनिधी :  बहुजनांना मागे ठेवण्याचे काम हिंदूत्ववादी असलेल्या आरएसएसकडून केले जात असल्याचा आरोप माजी न्यायमुर्ती बी. जी. कोसळे-पाटील यांनी केला.

पुरोगामी विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अमृतमहोत्सवीनिमीत्त कांताई सभागृहात झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कविवर्य ना.धो. महानोर, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील, उमविचे प्रथम कुलगुरु डॉ. एन. के. ठाकरे, प्रा. अर्जुन जाधव उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. आ. ह. साळुंखे यांचा मानपत्र देवून सत्कार करण्यात आला.

पुढे बोलतांना माजी न्या. कोळसे-पाटील म्हणाले की, अण्णा हजारे हे घटनाविरोधी असल्याने त्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. हजारे यांनी मागणी केलेलाजन लोकपाल कधीही मिळू शकत नाही कारण तशी संविधानात तरतूद नाही. मुद्दामहून या गोष्टी मांडल्या जात असल्याचा अरोपही त्यांनी केला.

तसेच ज्या व्यवस्थेने हजारो वर्ष तुम्हाला शिकू दिले नाही किंवा शिकविले नाही. त्या व्यवस्थेविरोधी लढणारे तुम्ही सैनिक होण्यासाठी तुम्ही शिकले पाहिजे असा आग्रह महात्मा फुले यांचा होता असे त्यांनी स्पष्ट करुन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने त्यांच्यावरही त्यांनी टीका केली.

विद्यापीठाचे प्रथम माजी कुलगुरु एन. के.ठाकरे, पद्मश्री कवी ना. धो. महानोर यांनीही मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. अर्जुन जाधव यांनी केले. अमळनेरचे प्रा. लिलाधर पाटील यांनी तयार केलेल्या सन्मानपत्राचे वाचन करण्यात आले. सुत्रसंचलन वसुंधरा लांडगे यांनी केले. कार्यक्रमाला विविध परिवर्तनवादी व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

हिंदू दहशतवाद्यांकडून करकरेंची हत्या

मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अजमल कसाब कींवा कोणत्याही मुस्लिम दहशतवाद्यांच्या गोळीने शहीद हेमंत करकरे यांची हत्या झालेली नाही. तर हिंदूत्ववादी दहशतवाद्यांच्या गोळीने ते मारले गेले असल्याचा खळबळजनक आरोप माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील यांनी केला.

सदैव ध्येयवादी रहा- डॉ. साळुंखे

सत्काराला उत्तर देतांना डॉ. आ. ह. साळुंखे म्हणाले की, भावी पिढया सुखाने जगाव्यात असे प्रत्येकाला वाटत असेल. तर आंतरीक ऐक्य टिकवायला पाहिजे. प्रत्येकाने डोळस. चिकीत्सक आणि ध्येयवादी असायला हवे असेही ते म्हणाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!