इतिवृत्त, अंदाजपत्रक, जलयुक्तसह खातेवाटपाच्या विषयांवरुन सभेत गदारोळ

0
जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-जिल्हा परिषदेच्या मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे, अंदाजपत्रकातील त्रुटया, जलयुक्त शिवार योजनेतील निकृष्ट दर्जाची कामे, पोषण आहार, खातेवाटप व कर्जमाफीच्या अभिनंदनाच्या विषयावरून जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत चांगलाच गदरोळ निर्माण झाला होता.
यावेळी सभागृहातील माईक सिस्टीम नादुरुस्त असल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हा परिषदेच्या सभेत पाझर तलावा देखभाल दुरुस्तीचा विषय स्थगित ठेवण्यात आला.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष ना. उज्वला पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, सभापती पोपट भोळे, दिलीप पाटील, प्रभाकर सोनवणे, रजनी चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, डेप्युटी सीईओ राजन पाटील यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते.

बैठकीच्या सुरवातील सभेचा अजेंठा ऐनवेळी देण्यात आल्याने राष्ट्रवादीचे गटनेते शशिकांत सांळुखे यांच्यासह सदस्य रविंद्र पाटील, डॉ.अमोल माने यांनी नाराजी व्यक्त करून सत्ताधार्‍यांकडून गळपेची सुरु असल्याचा आरोप केला.

यावेळी विरोधी गटाच्या सदस्यांनी सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. अजेंठा वेळेवर मिळणे ही प्रशासनाची घोडचुक असल्याचे प्रभाकर सोनवणे यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी गटनेते शशिकांत सांळुखे यांनी इतिवृत्ताबाबत अध्यक्षांनी उत्तर द्यावे असे सांगितले. यावेळी सभेचे सदस्य सचिव राजन पाटील यांनी सर्व सदस्यांना इतिवृत्त पाठविले असल्याचे सांगितले.

सदस्य रविंद पाटील यांनी कुठल्याही सदस्यांला इतिवृत्त मिळालेले नसल्याने ही सभा तहकुब करण्यात यावी अशी मागणी केली.

मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे या विषयाला पल्लवी सावकारे व जयपाल बोदडे यांच्यासह विरोधी गटाच्या सदस्यांनी या विषयांला नामंजुरी देण्यात यावी अशी मागणी सभागृहात केली.

यावेळी माधुरी अत्तरदे यांनी आपल्या कामांची फाईल सध्या कोणत्य विभागात आहे, यासाठी फाईल ऑनलाईन ट्राकींग सिस्टीम सुरु करण्यात यावी अशी मागणी केली.

बैठकीवेळी पोषण आहाराचे नमुने पल्लवी सावकारे, माधुरी अत्तरदे व रविंद्र पाटील यांनी सभागृहात सादर करून सभागृहाचे लक्ष वेधले.

पोषण आहाराच्या विषयावरून सभेत चांगलाच गोंधळ उडाला. यावेळी डॉ. निलीमा पाटील, मधुकर काटे, डॉ. माने, पाचोरा, चाळीसगाव, चोपडा, मुक्ताईनगर येथील पंचायत समिती सभापती यांनी विविध समस्या मांडून अधिकार्‍यांना धारेवर धरले. सभेच्या सुरवातीला डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने त्यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.

 

LEAVE A REPLY

*