अमेरिकन बनावटीचे शक्तीशाली चिनुक हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत

0
नवी दिल्ली :  अमेरिकन बनावटीचे CH-47F (I) चिनुक ही शक्तीशाली हेलिकॉप्टर्स आजपासून देशसेवेत दाखल होणार आहेत. चंदिगडच्या एअऱ फोर्स स्टेशनवरील बेस रिपेअर डिपोट (3-BRD) येथे एका कार्यक्रमाद्वारे या हेलिकॉप्टर्सचे राष्ट्रार्पण झाले.

या हेलिकॉप्टर्समुळे भारतीय हवाई दलाची क्षमता आणखी वाढली आहे. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेट सेंटर या दोन जुळ्या इमारतींवर हल्ला करणाऱ्या ओसामा बिन लादेनचा अमेरिकेने पाकिस्तानात घुसून या चिनुक हेलिकॉप्टर्सच्या मदतीने खात्मा केला होता.

चिनुकच्या या राष्ट्रार्पण कार्यक्रमासाठी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ, वेस्टर्न एअर कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ (एओसी-इन-सी) एअर मार्शल आर. नांबियार यांनी हजेरी लावली.

 

मात्र, लोकसभा निवडणुकीसाठी देशभरात सध्या आचारसंहिता लागू झाल्याने या कार्यक्रमासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण या उपस्थित राहिल्या नाहीत.

पहिल्या खेपेतील चार चिनुक हेलिकॉप्टर्सचे आज राष्ट्रर्पण झाले. ही चार अॅडव्हान्स डबल रोटर हेलिकॉप्टर्स भारतीय सैन्याला प्रत्यक्ष लढाईच्या वेळी आणि इतर वेळी सैन्याच्या पथकांना एका जागेवरुन दुसऱ्या जागी वाहून नेण्यासाठी उपयोगात येणार आहेत.

या विमानांची पहिली खेप चंदीगडच्या 3-BRD येथे जोडणीसाठी दाखल झाली आहे. अमेरिकेशी झालेल्या करारानुसार हवाई दलाला अशी १५ हेलिकॉपटर्स मिळणार आहेत.

अति उंचीवर अधिक अवजड सामग्री वाहून नेण्यासाठी सध्या भारताकडे रशियन बनावटीचे Mi-26 ही हेलिकॉप्टर्स सेवेत आहेत. त्यानंतर आता चिनुकचीही यात भर पडणार आहे. १९८६पासून हवाई दलाकडे चंदीगडच्या 3-BRDमध्ये ४ Mi-26 हेलिकॉप्टर्स आहेत.

LEAVE A REPLY

*