जळगाव पीपल्स बँकेतर्फे शालेय साहित्य वाटप

0
जळगाव । दि.14 । प्रतिनिधी-दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेतर्फे शहरासह जिल्ह्यातील शाळांमध्ये गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
पीपल्स बँकेतर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. सालाबादाप्रमाणे यावर्षीही शहरासह जिल्ह्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.

यावेळी बँकेचे चेअरमन भालचंद्र पाटील, संचालक डॉ.सी.बी.चौधरी, दादा नेवे, प्रा.विलास बोरोले, सुरेखा चौधरी, स्मिता पाटील, सुनिल पाटील, रामेश्वर जाखेटे, अनिकेत पाटील व बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

जळगाव परिसरातील- हरीजन कन्या छात्रालय जळगाव, जळगाव पब्लिक स्कुल, का.ऊ.कोल्हे विद्यालय जळगाव, आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कानळदा, अभिमान महादु वारके महाविद्यालय विदगाव, श्रवण विकास मंदीर सावखेडा, प्रकाश हायस्कुल सुनसगाव, न्यु इंग्लिश स्कुल नशिराबाद, जयहिंद विद्यालय कडगाव, सार्वजनिक विद्यालय असोदा, महात्मा गांधी विद्यालय भादली व श्रीमती कुसुमताई मधुकरराव चौधरी विद्यालय फैजपुर या शाळांमधील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना शालेय साहित्य संचाचे वाटप करण्यात आले.

शालेय साहित्य संचात 10 वह्या, 2 रजिस्टर, कंपास पेटी, इंग्लिश व गणिताची सराव पुस्तिका, शब्दार्थ पुस्तिका इत्यादी शालेय साहित्य देण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*