Type to search

maharashtra आवर्जून वाचाच जळगाव

भुसावळला स्वरनिनाद परिवारातर्फे उद्या संगीत स्वरसुमनांजली

Share
भुसावळ । प्रतिनिधी :  येथील कलायोगी कै.सतिश मराठे यांच्या 6 व्या स्मृती दिनानिमित्त प्रतिवर्षी प्रमाणे मराठे परिवार व स्वरनिनाद तर्फे उद्या शनिवार दि. 23 रोजी स्वर सुमनांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व कलांच्या प्रांतात लिलया वावरणारे भुसावळाततील जेष्ठ कलायोगी कै.सतिश मराठे यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रतिवर्षी या संगीत समारोहाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी हा कार्यक्रम शनिवार दि. 23 मार्च 2019 रोजी सायं. 7:00 वा. ब्राह्मण संघ ,न्यु एरिया वाँर्ड , भुसावळ येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमात मुंबई येथील प्रतिभावान गायक समीर अभ्यंकर हे शास्रीय आणि उपशास्त्रीय संगीताद्वारे आपली गायन सेवा सादर करणार आहेत. या स्वरमैफीलीत खान्देशातील जेष्ठ तबलावादक गुरूवर्य मनोज कुलकर्णी , भुसावळ हे तबल्याची तसेच युवा कलावंत तथा कै.सतिश मराठे यांचे चिरंजीव जितेश मराठे, भुसावळ हे संवादीनी ची साथसंगत करणार आहेत.

भुसावळच्या जाणकार संगीतप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात उपस्थिती द्यावी असे आवाहन श्रीमती रेखा मराठे आणि स्वरनिनाद परिवारातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!