जळगावला पावसाची रिमझिम

0

जळगाव | प्रतिनिधी : नाशिकला काल रात्रीपासून सुर असलेल्या सततधारेमुळे आज सकाळी अकरा वाजेपासून जळगावलाही पावसाने रिमझिमपणे हजेरी लावली आहे.

रिमझिम पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर विविध कामानिमित्ताने घराबाहेर पडणारे मात्र रेनकोट व छत्री अभावी अर्धवटपणे भिजत आहेत. तर काहीजण रिमढिम पडणार्‍या पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत.

ढगाळ आकाश आणि मधुन मधुन पडणारा रिमझिम पाऊस यामुळे चहा, कॉफीच्या विक्रीत वाढ झाली आहे.

रोमांचकारी पण आरोग्याला त्रासदायक

रिमझिम पडणारा पाऊस व सुटलेली मंद हवा यामुळे जळगावचे वातावरण रोमांचकारी वाटत असले तरी त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होत आहे. गार हवा व पाणी यामुळे डोकेदुखीचा त्रास होत आहे. तर संधीवात असणार्‍यांच्या वाताचा त्रासही वाढल्याचे दिसत आहे.

चिखलाचा त्रास

रिमझिम पडणार्‍या पावसामुळे रस्त्यावर मात्र चांगलाच चिखल झाला आहे. रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्याच्या खोलीचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने वाहने खड्ड्यांत आदळत आहेत. त्यामुळे वाहुतकीही विस्कळीत होत आहे.

 

LEAVE A REPLY

*