मू.जे.त रंगणार पुरुषोत्तम करंडक स्पर्धा

0
जळगाव | प्रतिनिधी :  खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्रीय कलोपासक, पुणे आणि मूळजी जेठा महाविद्यालय, नाट्यशास्त्र विभाग जळगाव. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पुरुषोत्तम करंडक आंतर महाविद्यालयीन स्पर्धा (प्राथमिक फेरी) २०१७-१८’चे आयोजित करण्यात आली आहे.

ही स्पर्धा दि.१५ ते १७ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

स्पर्धेत पहिल्या येणार्‍या ३० संघांनाच प्रवेश दिला जाईल. स्पर्धेसाठी एका महाविद्यालयाकडुन जास्तीत जास्त दोन एकांकिकांचे प्रवेश अर्ज सादर करता येतील.

दि. १४ ऑगस्ट २०१७ पासुन या स्पर्धेचे प्रवेश अर्ज उपलब्ध होतील. प्रवेश अर्जाची अंतिम मुदत ही दि.३१ ऑगस्ट पर्यंत असेल. प्रवेश अर्ज आणि स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी प्रा.हेमंत पाटील (८१४९३१८४९८), दिनेश माळी (९९७०७७१७१३) यांच्याशी संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

*