शिक्षणासोबत कौशल्य विकास महत्वाचा – डॉ.शिकरपूर

0

जळगाव |  प्रतिनिधी :  उच्च शिक्षण घेवून प्रत्येक विद्यार्थी आपल्या पात्रतेचे निकष पुर्ण करीत असतो. मात्र त्यातून आपल्याला यशाची सिद्धता प्राप्त होत नाही. प्रत्येक जणाला शिक्षण घेणे महत्वाचे आहेतच परंतू शिक्षण सोबत त्याला कौशल्य विकास करणे अत्यंत महत्वाचा असल्याचे मत डॉ. दीपक शिकरपूर यांनी व्यक्त केले.

जी.एच.रायसोनी बिझनेस मेनेजमेंटमध्ये रोटरी क्लब गोल्ड सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यानाच्या कार्यक्रमाप्रसंगी जागतिक स्तरावर रोजगाराच्या संधी या विषयावर ते बोलत होते.

यावेळी संचालिका डॉ.प्रीती अगरवाल, रोटरीचे अध्यक्ष अभिषेक अग्रवाल, सेक्रेटरी संजय दहाड, सी.ए. प्रवेश मुंदडा, प्रखर मेहेता, सी.ए.प्रिती मंडोरे, अनुराधा अग्रवाल, ममता दहाड आदि उपस्थित होते.

दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते पुढे म्हणाले की, रोजगाराच्या जगभरात खूप सार्‍या संधी आहेत. या संधी मिळविण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करतात. याच्यावर तुमचे भविष्य अवलंबून आहे.

शिक्षण घेत असतांना तुमच्यात नाविन्यता पूर्वक विचार करण्याची कल्पक बुद्धी असेल तर संधी शोधण्याची नजर आपण विकसित करू शकत असल्याचेही त्यांनी सांगीतले. तसेच शिक्षण घेऊन तुम्हाला दिशा मिळेल.

यशाची गती स्वतःला प्राप्त करायची आहे. आपण जर आईसक्रिम खात असाल तर फारच उत्तम आहे. परंतू मराठीत अर्थ बोध झालेली आईसक्रिम म्हणजे आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सक्रियता, क्रियाशीलता, व महत्वकांक्षा ही जर आईसक्रिम तुम्ही खात असाल तर यश तुमच्या पायथ्याशी असल्याचेही त्यांनी सांगीतले.

सूत्रसंचालन प्रा.राहुल त्रिवेदी यांनी केले. तर आभार प्रा. विजय गर्गे यांनी मानले. यावेळी रोटरी क्लबचे पदाधिकारी, महावाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पदवी पदव्युत्तर सर्व शाखेतील विद्यार्थी उपस्थित होते.

आवडीचे क्षेत्र निवडा

शिक्षण हे आपले भविष्य आहे. शिक्षण घेत असताना आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून त्या क्षेत्राकडे जाण्याची आपली तयारी पाहिजे. मग ते संगीत, क्रीडा, जाहिरात, फोटोग्राफी, सर्विसेस असे कोणतेही क्षेत्र असू द्या.

त्याक्षेत्राबद्दल तुम्हाला आवड असल्यास त्याक्षेत्रात तुम्हाला यश नक्की मिळेल. परंतु आपल्या आवडीच्या क्षेत्रात यशाची भरारी मारण्यासाठी त्याविषयी ज्ञान, माहिती व कौशल्य महत्वाचे असते.

सर्वांगिण विकास होणे गरजेचे – डॉ.अग्रवाल

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत कौशल्यधारित शिक्षण दिले पाहिजे. ज्याठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत त्याठिकाणी आवश्यक कौशल्य विकसित झालेली व्यक्तीची मागणी असते.

परंतू विद्यार्थ्यांचे इंग्रजी संवाद कौशल्य, तुमचा आत्मविश्वास, सादरीकरण, मेहनत घेण्याची तयारी आणि तुमचे ज्ञान असा सर्वांगीण विकास होणे काळाची गरज असल्याचे मत डॉ.प्रिती अग्रवाल यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

*