गायीच्या दुधापासून बनणार रेशीम

0
लंडन | वृत्तसंस्था :  रेशमाचा शोध हा जगातील काही महत्त्वाच्या शोधांपैकी एक मानला जातो. चीनमध्ये एका राजकुमारीला सर्वप्रथम रेशमाचा किडा आणि त्याचे मऊ, लवचिक तंतू यांचा शोध लागला असे म्हटले जाते.

रेशमाचा व्यापारही सर्वप्रथम चीनमधूनच सुरू झाला आणि चीनमधून जाणारा ‘रेशीम मार्ग’ ही प्रसिद्ध आहे. हल्ली जगभरात रेशीम हे कीटकांचे संगोपन करून मिळविले जाते.

परंतु, आता चक्क गायीच्या दुधापासून रेशीम तयार करण्याचे तंत्र शोधण्यात आले आहे. गायीच्या दुधातील ‘व्हे प्रोटिन’च्या आधारे शास्त्रज्ञांनी रेशीम निर्मिती केली आहे.

स्वीडनच्या रॉयल इन्स्टिट्यूट ऑङ्ग टेक्नॉलॉजी येथील संशोधक स्टीङ्गन रॉथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अशा कृत्रिमरीत्या तयार करण्यात आलेल्या रेशमाचा अनेक क्षेत्रात उपयोग होऊ शकतो. जसे की, जखम झाल्यानंतर ड्रेसिंग करताना विरघळणारे टाके घालण्याठी.

सध्या कृत्रिमरीत्या मिळालेले हे रेशीम ५ मिलिमीटर एवढे असून ते सर्वसाधारण दर्जाचे आहे. याबाबचे पुढील संशोधन सुरू असून हे कृत्रिम रेशीम वापरून त्याचे लांब व टिकाऊ धागे तयार करण्याबाबतचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती रॉथ यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

*