राष्ट्रवादीचा मुक मोर्चा सरकारचा निषेध

0
जळगाव । दि.13 । प्रतिनिधी-अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी येथिल पिडीतेवर अत्याचार प्रकरणी वर्षभरात दोषींवर कारवाइ करण्याचे आश्वासन शासनाने दिले होते.
मात्र, वर्ष उलटून देखिल पिडीतेला न्याय मिळालेला नाही. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली मुक मोर्चा काढण्यात येऊन सरकारचा निषेध करण्यात आला.
कोपर्डी येथील घटनेला वर्ष उलटुन गेले. तरी आरोपींवर अद्याप कारवाई झाली नसल्याने राष्ट्रवादीतर्फे राज्यभरात मुक मोर्चा काढण्यात आला.

 

जळगावातही राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधानसभेचे माजी अध्यक्ष आ. दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज राष्ट्रवादी कार्यालयापासुन जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढण्यात आला.

मोर्चात जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आ. दिलीप वाघ, राजीव देशमुख, माजी खा. अ‍ॅड वंसतराव मोरे, अ‍ॅड. रविंद पाटील, अनिल भाईदास पाटील, वाल्मीक पाटील, संजय पवार, उज्वल पाटील, अ‍ॅड. कुणाल पवार, निलेश पाटील, समन्वयक विकास पवार, मिनल पाटील, मंगला पाटील, कल्पिता पाटील, प्रतिभा शिरसाठ,आशा येवले, सविता बोरसे, शितल साळी, नामदेव चौधरी, राजेश पाटील, योगेश देसले, जि.प. गटनेते शशिकांत साळुंखे, जि.प. सदस्य रविंद्र पाटील,सलीम इनामदार, अयाज अली, यांच्यासह जिल्हा संघटना, युवक, महिला व सर्व सेलेचे अध्यक्ष उपाध्यक्षांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*