आसोदा, नशिराबादच्या शेतकर्‍यांचा प्रश्न अधिवेशनात मांडणार – आ.अजित पवार

0
जळगाव । दि.13 । प्रतिनिधी-कोपर्डी घटनेच्या मुकमोर्चानंतर आ. अजित पवार यांनी आसोदा व नशिराबाद येथील उपोषण करणार्‍या शेतकर्‍यांची भेट घेतली.
रेल्वे प्रशासनाकडून जमिनीच्या भूसंपादनापोटी जाहीर झालेल्या निवाड्यात शेतकर्‍यांवर अन्याय झाल्याच्या व्यथा शेतकर्‍यांनी आ. पवारांकडे मांडल्या.

यावेळी आ. अजित पवार यांनी हा प्रश्न राज्याच्या व केंद्राच्या अधिवेशनात प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले.

यावेळी प्रांताध्यक्ष आ. सुनिल तटकरे, प्रभारी आ. दिलीप वळसे-पाटील, जिल्हाध्यक्ष आ. डॉ. सतिष पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, संजय चव्हाण आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*