एरंडोल तालुक्यातील गालापूरच्या भिल्ल वस्तीतील शाळेला आय.एस.ओ.मानांकन

0
एरंडोल, |  श.प्र. :  उत्राण रस्त्यावरील गालापूर गावातील भिल्लवस्तीतील जि.प.शाळेला आय.एस.ओ.मानांकन मिळाले असून शाळेस मानांकन मिळवण्यात शाळेतील मुख्याध्यापक यांचा सिहाचा वाटा आहे.

सुमारे ६५ कुटुंब व ३५० सदस्य असलेली गालापूर येथील भिल्ल वस्तीत अनेक वर्षापासून कोणत्याही मुलभूत सुविधा नव्हत्या. जि.प.शाळा मातीच्या भिंतींची होती.

सुमारे एक वर्षापूर्वी या शाळेत किशोर पाटील कुंझरकर हे मुख्याध्यापक म्हणून रुजू झाले.त्यांनी हळूहळू तेथील रहिवाशांचा विश्वास संपादन करीत वस्तीतील विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली तसेच विविध शैक्षणिक सुविधा सवलतींची माहिती करून दिली.

शाळेला रंगरंगोटी करून विविध सुविधा उपलब्ध केल्या. वस्तीतील बहुतांश पालक हे मोलमजुरी करणारे असल्याने सकाळ पासून ते संध्याकाळ पर्यंत ती कामात व्यस्त असत त्यामुळे शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांची स्वतः अंघोळ घालून त्यांच्या आरोग्याची निगा राखली.

त्याचप्रमाणे गावात व शाळेत विविध उपक्रम राबवुन जनजागृती सोबत विद्यार्थ्यांमध्ये शाळेची गोडी निर्माण केली.शाळेला डिजिटल करण्यात त्यांचा खारीचा वाटा आहे.

यावेळी के.एन.व्ही.यु.के.चे दूत गजानन माळी यांच्या हस्ते मुख्याध्यापक किशोर पाटील कुंझरकर यांना आय.एस.ओ.मानांकनाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

उपक्रमास कुंझरकर यांच्यासोबत शाळेतील शिक्षक शरीङ्ग शेख व ग्रामस्थ आरिङ्ग शेख, रामचंद्र मोरे, आर,एम.पवार, धनराज महाजन, सखाराम सोनवणे, सुरेश भिल,पितांबर भिल, पिंटू मोरे, सिमा सोनवणे यांचे सहकार्य लाभत आहे.

LEAVE A REPLY

*