‘त्या’ दोघं लाचखोरांना दोन दिवस पोलीस कोठडी

0
जळगाव । दि.13 । प्रतिनिधी-पाचोरा तालुक्याल पिंपळगाव हरेश्वर येथील मच्छिमार सोसायटीचा निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यासाठी 15 हजाराची लाच घेतांना सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक व लेखा परिक्षकांना लाचलुपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले होते.
याप्रकरणी आज न्या. लाडेकर यांच्या न्यायालयात कामकाज झाले असता. त्या दोघांना दोन दिवसाची पोलिस कठोडी सुनावण्यात आली.
पिंपळगाव हरेश्वर येथील मच्छिमार सोसायटीचा पंचवार्षिक कार्यकाळ संपला असून त्या सोसायटीचा निवडणुक कार्यक्रम निवडणुक विभागाकडून जाहिर होत नव्हता.

या निवडणुकीसाठी संस्थेचे चेअरमन भिका भोई यांनी पाठपुरावा केला असता. त्यांना निवडणुक कार्यक्रम जाहिर करण्यासाठी सकाय्यक निबंधक लक्ष्मण गढेकर यांनी 15 हजारांची लाच मागीतली होती.

दरम्यान भिका भोई यांनी संस्थेतील त्या दोघ कर्मचार्‍यांविरुद्ध लाचलुपत प्रतिबंक विभागाचे उपविभागगीय पोलिस अधिकारी पराग सोनवणे यांच्याकडे तक्रार केली होती.

दरम्यान दि. 12 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिरसोली रोडवरील हाजी मलंग बाबा यांच्या दर्गाजवळ लेखापरिक्षक मजीदखाँ कालेखाँ जमादार व सहाय्यक निबंधक रवी गडेकर यांना अटक भिका भोई यांच्याकडून लाच घेतांना अटक करण्यात आली होती.

याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दोघ लाचखोरांना आज न्यायालयात हजर केले असता. त्यांना दोन दिवसाची पोलिस कठोडी सुनावण्यात आली असून सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. भारती खडसे यांनी कामकाज पाहिले.

 

LEAVE A REPLY

*