जिल्हा रुग्णालयाची जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी

0
जळगाव । दि.13 । प्रतिनिधी-जिल्हा सामान्य रुग्णालयात दररोज हजारोंच्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात. रुग्णांना योग्य सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडून आज जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी करण्यात आली.
पाहणी करीत असतांना वार्डातील कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र वार्ड तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी रुग्णालयाच्या प्रशासनाला दिले.
जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना मिळणार्‍या सोयी सुविधांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी सकाळी 12 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयालातील एआरटी सेंटरला भेट दिली.

दरम्यान एआरटी सेंटर मधील रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्याठिकाणी उपचारासाठी जागा कमी पडत असून या विभागाला स्वतंत्र इमारतीची मागणी या विभागाकडून करण्यात आली.

तसेच या विभागात रुग्णांवर उपचार करण्यासाठी असलेली यंत्र सामुग्री खराब झाली असल्याने याठिकाणी अत्याधुनिक यंत्र सामुग्री मिळण्याची मागणी अधिकार्‍यांकडून जिल्हाधिकार्‍यांकडे करण्यात आली.

यावेळी जिल्हाधिकार्‍यांनी या सर्व सोयी सुविधा मिळण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे आदेश रुग्णालयातील प्रशासनाला देण्यात आले आहे.

त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांनी रुग्णालयातील सर्व विभागांना भेट देवून वार्डातील परिस्थीतीची पाहणी करुन रुग्णांना चांगल्या पद्धतीच्या सोयी सुविधा देण्याचे आदेश दिले.

यावेळी डिवायएसपी सचिन सांगळे, शल्यचिकीत्सक डॉ. सुनिल भामरे, अतिरीक्त शल्यचिकीत्सक डॉ. किरण पाटील, आरएमओ डॉ. विजय जयकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुर्यवंशी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

वार्डांतील सुविधांसाठी 75 लाखाचा प्रस्ताव
जिल्हा रुग्णालयातील पाहणी करीत असतांना त्यांनी वार्ड क्रमांक 7, 8, 9 या वार्डांची पाहणी केली. यावेळी त्यांना या वार्डात सोयी सुविधांचा अभाव दिसून आल्याने व या वार्डात सोयी सुविधा देण्यासाठी व त्याची दुरुस्ती करण्यासाठी सुमारे 75 लाख रुपयाचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश रुग्णालय प्रशासनाला दिले.

रुग्णालयाच्या बाहेर होणार पोलिस चौकी
जिल्हा रुग्णालयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर असतो. याठिकाणी कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या बाहेर स्वतंत्र पोलिस चौकी तयार करावी. तसेच पोलिस चौकीची जागा देखील जिल्हाधिकार्‍यांनी निश्चीत केली असून याठिकाणी पोलिस चौकी तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिली.
धोकेदायक झाड तोडण्याचा प्रस्ताव तयार करण्याची सूचना
गेल्या काही महिन्यांपूर्वी सामान्य रुग्णालयात वाळलेल्या झाडाची फांदी तुटून एका महिलेचा मृत्यु झाला होता. दरम्यान जिल्हा रुग्णालयातील आपतकालीन कक्षाच्या बाजूला एक वाळलेले झाड आहे. हे झाड तोडण्यासाठी प्रस्ताव तयार करुन तो महापालिकेत देण्याच्या सुचना त्यांनी केली.

भूमीगत गटारी तयार होणार
रुग्णालयाच्या आवारात सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारी नाहीत. त्यासाठी जिल्हा रुग्णालयात भूमीगत गटारी तसेच रुग्णालयाच्या परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी सुलभ शौचालय नसल्याने ते याठिकाणी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र सुलभ शौचालय बांधण्यासाठी प्रस्ताव तयार करुन सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

25 संगणक, प्रिंटर्स मंजूर
जिल्हा रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण उपचारासाठी येत असतात. त्यांची संपुर्ण माहिती जिल्हा रुग्णालयात उपलब्ध व्हावी यासाठी रुग्णालयाला 25 संगणक व 25 प्रिंटर मंजूर करण्यात आले आहे.

महावितरणच्या अधिकार्‍यांची कानउघडणी
महावितरणकडून सिटीस्कॅन साठी लागणारे स्वंत्र डिपी नव्हती. सिटी स्कॅनच्या मशिनसाठी डिपीचार्ज करावी लागते. परंतू वारंवार पत्रव्यवहार करुन देखील महावितरणच्या अधिकार्‍यांकडून डिपीचार्ज केली जात नसल्याचे महावितरणच्या अधिकार्‍यांची जिल्हाधिकार्‍यांची कानउघडणी करुन डिपी चार्ज करण्याचे आदेश दिले.

 

 

LEAVE A REPLY

*