सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धेत स्वामी विवेकानंद व सेंट जोसेफ स्कुल विजयी : रबाब तरवरी, वैष्णव बेंडाळे उत्कृष्ट खेळाडू

0
जळगाव | प्रतिनिधी :  येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलावर सुरू असलेल्या म.न.पा.सुब्रतो मुखर्जी फुटबॉल चषक स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात मुलींमध्ये सेंट जोसेफ तर मुलांमध्ये स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने सुब्रतो मुखर्जी चषक पटकाविले.

सदरचा चषक, विजयी व उपविजयी पदक तसेच उत्कृष्ट खेळाडूचे चषक जैन स्पोर्टस ऍकडमीतर्फे देण्यात आले.
विजयी व उपविजयी संघास उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, माजी महापौर किशोर पाटील, फुटबॉल असो.सचिव फारूख शेख, फॅशन डिझायनर अंजली देशमुख, डॉ.अण्णासाहेब बेंडाळे महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.अनिता कोल्हे यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आले.

स्पर्धेला पंच म्हणून फारूख शेख, लियाकत अली, अ.मोहसीन, कादर तडवी, शाहीद शेख, चेतन कोळी, ईश्‍वर मराठे, अभिषेक पाहरकर, चैतन्य निकम, धनंजय धनगर, सुषमा ठेरे, रोहिणी सोनवणे आदिंनी काम केले.

मुली उपांत्य फेरी – सेंट जोसेफ विजयी विरूध्द ए.टी.झांबरे २-०, डॉ.बेंडाळे विजयी विरूध्द रायसोनी १-०, सेंट जोसेफ विजयी विरूध्द डॉ.अण्णासाहेब बेंडाळे १-०, मुले उपांत्य रूस्तमजी विजयी विरूध्द बाहेती महाविद्यालय ४-१, स्वामी विवेकानंद कॉलेज विजयी विरूध्द सेंट टेरेसा १-०, स्वामी विवेकानंद विजयी विरूध्द रूस्तमजी १-०.

आय.एम.आर.च्या प्रा.डॉ.शमा सराफ, गृहीणी श्रीमती शारदा ब्राम्हणे, बॅडमिंटन प्रशिक्षक सै.बादशाह, फुटबॉल प्रशिक्षक अ.मोहसीन, हॉकी प्रशिक्षक सै.लियाकत अली, बुध्दीबळ प्रशिक्षक प्रविण ठाकरे उपस्थित होते.

स्पर्धेत मुलींमध्ये सेंट जोसेफची रबाब तरवारी तर मुलांमध्ये स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचा वैष्णव बेंडाळे यांनी उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान पटकविला

LEAVE A REPLY

*