Type to search

राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके

Breaking News maharashtra आवर्जून वाचाच जळगाव देश विदेश मुख्य बातम्या

राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके

Share
जळगाव |  गुजरात येथील गणपत युनिव्हर्सिटी येथे  झालेल्या आठव्या `अन्वेषण` राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दोन गटांमध्ये प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके प्राप्त झाली. संपूर्ण भारतात प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिके प्राप्त करणारे हे एकमेव विद्यापीठ ठरले आहे.
दि.12 ते 14 मार्च या कालावधीत असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज्, नवी  दिल्ली यांच्या वतीने गुजरातमध्ये ही आठवी अन्वेषण राष्ट्रीय संशोधन स्पर्धा पार पडली. पूर्व विभाग, पश्चिम विभाग, दक्षिण विभाग, उत्तर विभाग आणि मध्य विभाग या पाच विभागांमधून जिंकून आलेले प्रत्येकी पंधरा विजेते या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा विद्यार्थी शुभम पाटील याने बेसिक सायन्स या गटात आणि मनिषा चौधरी या विद्यार्थिनीने सोशल सायन्स या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले. महाराष्ट्रातील इतर विद्यापीठांपेक्षा प्रथम क्रमांकाचे दोन पारितोषिक पटकावून हे विद्यापीठ महाराष्ट्रात तर अग्रेसर राहिलेच यासोबतच देश पातळीवर देखील अग्रेसर राहिले.
या स्पर्धेच्या फेरीत प्रत्येक गटातून प्रथम आलेल्या विद्याथ्र्यांचे सुवर्णपदकासाठी पुन्हा सादरीकरण घेण्यात आले. त्यासाठी निवडण्यात आलेल्या पाच विद्याथ्र्यांमध्ये शुभम पाटील व मनिषा चौधरी  या दोघांचा समावेश होता.
 शुभम पाटील हा विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेत एम.एस्सी. द्वितीय वर्षात शिकत आहे. या स्पर्धेत दिव्यांग लोकांसाठी त्याने तयार केलेले हिअरींग ग्ॉझेट ठेवण्यात आले होते. जन्मत: ज्या लोकांना ऐकायला येत नाही अशा लोकांना दातांच्या कंपनाद्वारे ऐकायला येण्यासाठीचे संशोधन त्याने केले आहे.
त्यासाठी त्याने मोबाईलमध्ये एक अॅप विकसित केले असून या माध्यमातून मोबाईलच्या अॅपमधून दातांमध्ये होणाज्या कंपनाद्वारे दिव्यांग लोकांना ऐकू येवू शकतो. या संशोधनाच्या यशस्वीतेसाठी त्याने आतापर्यंत 128 दिव्यांग मुलांवर व 65 दिव्यांग प्रौढांवर प्रयोग केले आहेत.
 मनिषा चौधरी ही गरुड महाविद्यालय, शेंदूर्णी येथे वाणिज्य द्वितीय वर्षात शिकत असून महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी तिने महिलांच्या स्वसंरक्षणार्थ पाण्याची बॉटल तयार केली आहे. बेस्ट इमर्जन्सी  डिफें डिंग इन्स्टäयमेंट (BEDI) असे या बॉटलचे नाव आहे. या बाटलीत पिण्याचे पाणी, कटर, टार्च, सायरन, जीपीएस, करंट बटन इमर्जन्सी म्ॉसेज सिस्टीम, ऑटोकॉल रिसिव्ह, चिलि स्प्रे या सारखे नऊ स्वसंरक्षणाचे ग्ॉझेट बसविले आहेत. या बाटलीचे तिने पेटंट फाईल केले आहेत.
 कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला राष्ट्रीय स्तरावर संशोधन स्पर्धेत या प्रकारचे प्रथमच घवघवीत यश प्राप्त झाल्याबद्दल कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील, प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर, कुलसचिव भ.भा.पाटील यांनी या विद्याथ्र्यांचे कौतुक केले.
यावेळी दोन्ही विद्याथ्र्यांसमवेत मेंटर म्हणून गेलेले प्रा.दीपक दलाल, डॉ.योगिता चौधरी, अविष्कार संशोधन स्पर्धेचे समन्वयक  प्रा. भूषण चौधरी, प्रा.अजय पाटील, शेंदूर्णी येथील गरुड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय गरुड, सचिव सागरमल जौन, प्रा.सुनील गरुड उपस्थित होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!