शहरी भागात रात्री नऊ पुर्वी, ग्रामिण भागात सायंकाळी सहा वाजेपुर्वी एटीएममध्ये रक्कम भरण्याचे आदेश

0
नवी दिल्ली : ऍनी टाईम मशिन अर्थात एटीएम मध्ये पैसे भरण्याच्या वेळेत केंद्र सरकारने बदल केले आहेत. त्यानुसार आता शहरी भागात रात्री नऊपुर्वी तर ग्रामिण भागात सायंकाळी सहापुर्वी पैसे भरण्याचे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी 8 फेब्रुवारी 2019 पासून करण्यात येणार आहे.

. नक्षलवादाचा प्रभाव असलेल्या भागात मात्र, दुपारी चारपर्यंतच एटीएममध्ये रक्कम भरण्यात येणार आहे.

नव्या नियमांनुसार एटीएममधील रोख रकमेची वाहतूक आणि व्यवस्थापन करणाऱ्या एजन्सींना दुपारच्या जेवणाच्या आधीच रेख रक्कम ताब्यात घ्यावी लागणार आहे. तसेच, रोख रकमेची वाहतूक करताना दोन हत्यारबंद पोलिसांची मदत घ्यावी लागणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार ही नियमावली ८ फेब्रुवारी २०१९पासून अंमलात येणार आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये रकमेची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर, एजन्सींवर हल्ले करण्यात आले असून, एटीएमशी संबंधित गुन्ह्यांमध्येही वाढ नोंदविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

खासगी क्षेत्रातील दवळपास आठ हजार वाहनांच्या माध्यमातून देशभरातील एटीएममध्ये रक्कम पाठवली जाते. या माध्यमातून दररोज जवळपास १५,००० कोटी रुपयांच्या रकमेची वाहतूक केली जाते. बऱ्याचदा एजन्सींकडून एटीएममध्ये भरायची रक्कम रात्रीच्या वेळी आपल्या कॅश व्हॉल्टमध्येही ठेवली जाते.

LEAVE A REPLY

*