Blog : हल्ल्याचा धडा

0
अमरनाथ यात्रा ही काश्मीरच्या इतिहासातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा मानली जाते. मात्र या यात्रेचा इतिहास नजरेखालून घातल्यास अमरनाथ यात्रेला येणार्‍या यात्रेकरुंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे.
विशेषतः या यात्रेवरील दहशतवादाचे सावट हे तर नित्याचेच झाले आहे. नुकत्याच झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी स्पष्ट झाल्या आहेत. सय्यद सलाउद्दीनला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यात आल्यानंतर अमरनाथ यात्रेवर हल्ला होईल असा इशारा गुप्तचर खात्याने दिला होता, मात्र सुरक्षा व्यवस्थेतील मर्यादांमुळे आणि उणिवांमुळे पूर्वसूचना मिळूनही तो टाळता आला नाही, ही खेदाची बाब आहे.

गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये अशांततेचे वातावरण आहे. विशेषतः बुर्‍हान वणी या हिजबुलच्या पोस्टर बॉयला लष्कराने कंठस्नान घातल्यानंतर सुरू झालेला काश्मीरमधील हिंसाचार अद्याप शमलेला नाही. लष्कराकडून दहशतवाद्यांना लगाम घालण्यासाठी कसोशीने प्रयत्न सुरू असून गेल्या काही दिवसांतील चकमकींमध्ये बरेचसे दहशतवादी आणि घुसखोर मारले गेले आहेत आणि पकडण्यात आले आहेत.

मात्र तरीही काश्मीरमध्ये या देशविघातक कारवाया सुरूच आहेत. तशातच हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र मानल्या जाणार्‍या अमरनाथ यात्रेवर दहशतवादी हल्ला झाला. काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेतील भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात ७ जण ठार झाले.

अनंतनागमधील बेंटेगू आणि खानबल भागात दहशतवाद्यांनी हल्ले केले. यामध्ये ११ भाविक जखमी झाले असून या दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्यांपैकी दोन भाविक महाराष्ट्रातील पालघरचे आहेत.

अमरनाथ यात्रा ही काश्मीरच्या इतिहासातील एक महत्त्वाची धार्मिक यात्रा मानली जाते. अमरनाथ गुङ्गा ही महत्त्वाची श्रद्धास्थान मानली जाते. ती गुङ्गा १२ हजार ७५६ ङ्गुटांवर वसलेली आहे. श्रीनगरपासून या गुङ्गेचे अंतर १४१ किलोमीटर आहे. या यात्रेला जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. एक जम्मू-उधमपूर हा रस्ता अतिशय छोटा असला तरीही तो अतिशय कठीण भागातून जातो. त्यामुळे तिथून ङ्गारसे यात्रेकरू जात नाहीत.

दुसरा रस्ता काश्मीर खोर्‍यातून पहलगाम भागातून जातो. तो जास्त महत्त्वाचा समजला जातो. कारण पहलगामच्या बेस कॅम्पपर्यंत हे रस्ते पोहोचले आहेत. त्यानंतर चार ते पाच दिवस आपल्याला चालत जावे लागते. ही गुङ्गा वर्षभर बर्ङ्गाच्छादित असते. मात्र शिवलिंग १३० ङ्गूट लांबीच्या गुहेत तयार होते. या शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी जुलै ते ऑगस्टदरम्यान ही यात्रा मोठ्या प्रमाणात सुरू होते.

जीवनाचा अर्थ काय आणि मोक्ष कसा मिळवावा हे याच ठिकाणी प्रत्यक्ष शिवाने पार्वतीला सांगितले होते. त्यामुळे या स्थानाचे आणि त्यामुळेच या यात्रेेचे महत्त्व आपल्या देशात अधिक आहे.

असे असले तरी गेल्या १६ वर्षांतील या यात्रेचा इतिहास नजरेखालून घातल्यास अमरनाथ यात्रेला येणार्‍या यात्रेकरूंना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. विशेषतः या यात्रेवरील दहशतवादाचे सावट हे तर नित्याचेच झाले आहे. २००० मध्ये पहलगाममध्ये ३० यात्रेकरूंना ठार मारले होते.

दरवर्षी काश्मीर सरकारही काही ना काही कारणाने ही यात्रा रोखून धरण्यासाठी त्रास देत असते. सुमारे ५० ते ७० दिवस चालणार्‍या या यात्रेचा कालावधी कमी करून तो २०-२५ दिवसांवर आणला जातो. काश्मीरमधील पीडीपी आणि नॅशनल कॉन्ङ्गरन्स या राजकीय पक्षांना या भागात हिंदू धर्मियांच्या यात्रा नको असतात. त्याचप्रमाणे हुरियत कॉन्ङ्गरन्स नेहमीच काही कारणाने विरोध करत असते.

अनेकदा दहशतवादी या यात्रेवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतात. यात्रेच्या रस्त्याच्या कडेला तंबू उभारण्यासाठी जागेची गरज असते. एवढेच नव्हे तर या गुङ्गेपाशी लोकांना आराम करता यावा म्हणून जागेची गरज असते. मात्र काश्मीरमध्ये याविरोधात आंदोलन झाले होते. या यात्रेसाठी जागा देऊ नये, अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली होती. हा सर्व पर्वतमय भाग असल्याने तिथे कोणीही वास्तव्य करत नाही. पण तरीही काश्मीर सरकार यात्रेकरूंसाठी जमीन देण्यास टाळाटाळ करत होते.

मात्र तत्कालीन राज्यपालांनी यात्रेकरुंना जागा देण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे तर अनेक वेळा या यात्रेचा पर्यावरणाला धोका असल्याचा अपप्रचार केला जातो. काश्मिरात येणारे पर्यटक किंवा दल लेकला वर्षभर भेट देणारे पर्यटक यांच्यामुळे पर्यावरणाला धोका होत नाही.

मात्र काश्मीर खोर्‍यात अशा प्रकारच्या धार्मिक यात्रा होऊ द्यायच्या नाहीत यासाठी हा खटाटोप असतो. अमरनाथ यात्रेसाठी काश्मीरमध्ये येणार्‍या गाड्यांवर २ हजार रुपये इतका कर लावण्यात येतो. मोगलांच्या काळातील जिझीया कराप्रमाणेच हा प्रकार आहे. भारतातील कोणत्याही यात्रेवर कर लागल्याचे ऐकिवात नसताना अमरनाथ यात्रेलाच कराच्या कचाट्यात आणण्याचे कारण केवळ विरोध हेच आहे.

एका बाजूला हा विरोध आणि दुसर्‍या बाजूला दहशतवादाचे सावट यामुळे दरवेळी यात्रेकरुंना तणावाखालीच ही यात्रा करावी लागते. अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने पुन्हा एकदा या यात्रेला दहशतवादाचा कसा धोका असतो हे पुढे आले. अर्थातच गुप्तहेर खाते हल्ल्याची पूर्वसूचना देते. मात्र नेमका हल्ला कुठे होणार, कधी होणार हे माहिती नसल्याने त्या भागाचे नेमके रक्षण करता येत नाही.

मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोर ज्या गाडीतून आले होते त्या गाडीचा पास नव्हता. तसेच ती गुजरातमधून आली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कारणे काहीही असली तरी त्यातून सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी स्पष्टपणाने समोर आल्या आहेत.

आता घडलेल्या घटनेचा तपास करताना रात्रीच्या वेळी ही गाडी रस्त्यावर कशी आली? त्यामध्ये कोणी ङ्गुटीर कर्मचारी नव्हता ना? त्याने रात्रीच्या वेळी निघालेल्या ट्रकवर हल्ला करण्याविषयीची माहिती दिली नाही ना? याची चौकशी झाली पाहिजे.

हल्ला झाला तरी यात्रा खंडित न करण्याचा निर्णय राज्य आणि केंद्र सरकार घेणार आहे. मात्र हे एक मोठे आव्हान असेल. सध्या या यात्रेसाठी तीन प्रकारची सुरक्षा आहे. काश्मीर पोलीस रस्त्यावरून जाणार्‍या प्रवाशांना संरक्षण देत आहेत. दुसरीकडे केंद्रीय राखीव सुरक्षा दल संरक्षणासाठी सिद्ध आहे. डोंगराळ भागात सैन्याला तैनात करण्यात आले आहे.

मात्र १४० किलोमीटरमध्ये रक्षण करणे शक्य नाही. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था मजबूत करण्यासाठी दुपारी सैनिकांची संख्या वाढवावी लागणार आहे. तसेच तंत्रज्ञानाच्या मदतीने म्हणजे यात्रेच्या मार्गावर युएव्हीच्या माध्यमातून, हेलिकॉप्टरच्या मदतीने लक्ष ठेवावे लागेल.

गुप्तहेर खात्याला जास्तीत जास्त बळकट करून अशा प्रकारचा हल्ला होणार असेल तर तो उधळून लावण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. तसेच सुरक्षा दलांना दहशतवादविरोधी अभियान अधिक जोमाने राबवून त्या भागात असलेल्या दहशतवाद्यांवर हल्ला करून त्यांना पकडावे लागेल.

निवृत्त ब्रिगेडीअर हेमंत महाजन

LEAVE A REPLY

*