माजी आ.हरिभाऊंची ‘घर वापसी’

0
धरणगाव |  प्रतिनिधी :  जिल्ह्यात शिवसेनेचा पाया भक्कम रोवणारे, उत्तर महाराष्ट्रातील शिवसेनेचे पहिले आमदार हरिभाऊ महाजन यांची उध्दव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेते ‘घर वापसी’ झाली.

हरिभाऊ महाजन यांच्या मुळे शिवसेनेला जिल्ह्यात मोठी उर्जा मिळणार आहे. त्यांना मानणारा जुन्या, जाणत्या शिवसैनिकांमध्ये नवी उभारी निर्माण होणार असल्याने शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्यासोबत चेतन जाधव व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केला.

हरिभाऊ महाजन एरंडोल विधानसभा मतदार संघातून शिवसेनेकडून निवडून आले होते. हाडाचा शिवसैनिक असलेला हा मावळा कधी काळी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्यातील ताईत होता. मात्र, १९९१ मध्ये छगन भुजबळ यांच्या बंडात सहभागी होवून हरिभाऊंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केला होता.

मात्र, निष्ठावान शिवसैनिक असलेले हरिभाऊ शिवसेनेनंतर कोणत्याच राजकीय पक्षात रमले नाहीत. सध्या ते राष्ट्रवादीत होते. दरम्यानच्या काळात त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या अनेकदा चर्चा उठल्या मात्र, ते क्षण वास्तावात येत नव्हता. आज हा योग उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत जुळून आला. आपल्या जेष्ठ सहकार्‍याला भेटून उध्दव ठाकरेंसोबत आलेले सेनेचे मंत्री आणि नेत्यांनाही आनंद झाला. यासर्वांनी हरिभाऊं महाजन यांना मुंबई भेटीचे निमंत्रण दिले.

हरिभाऊ महाजन जिल्ह्यातील माळी समाजाचे पहिलेच आमदार होते. त्यांना मानणारा समाजात मोठा वर्ग आहे. शिवाय जळगाव ग्रामिण मतदार संघात माळी समाजाचे प्राबल्य असल्याने आगामी विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने शिवसेना, ना.गुलाबराव पाटील यांच्यासाठी हरिभाऊंची ‘घर वापसी’ प्रचंड लाभदायक ठरणार असल्याचे मानले जात आहेे.

शिवाय मुंबई शिवसेनेतही हरिभाऊंचे थेट संबंध असल्याने ना.गुलाबराव पाटील यांचाही भार हलका होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

*