अंतुर्लीत वृक्षारोपणाचा फज्जा

0
अंतुर्ली, ता.मुक्ताईनगर | वार्ताहर : दि. १ ते ७ जुलै दरम्यान वृक्षलागवडीसाठी देण्यात आलेले उद्दीष्ठ पूर्तीसाठी संपूर्ण जिल्हाभरात वन विभागाने ग्रा.पं., प्राथ.आरोग्य केंद्र, जि.प. शाळा यांना वृक्ष लागडीचे उद्दीष्ठ दिले होते.

याबाबत वन विभागाकडून आलेल्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्याची जबाबदारी संबंधित ग्रामपंचायत, सरपंच, ग्रामसेवक व सर्व सदस्यांवर असतांना येथील ग्रा.पं.ला प्राप्त झालेल्या रोपट्यांचे वृक्षारोपण करण्याऐवजी पदाधिकारी व कर्मचारी यांनी हातोहात रोपट्यांचे वाटप केले.

उर्वरित रोपटे प्राथमिक आरोग्य केंद्रात उघड्या जागी टाकून दिल्याने व त्यांची काळजी घेतली न गेल्याने रोपट्यांचे नुकसान होत आहे. वृक्षारोपणाचा दि. १ ते ७ जुलै नंतरही १०जुलैपर्यंत रोपटे जागीच जशाच तसे पडून होते.

रोपट्यांचे होत असलेले नुकसान पाहता गावातील काही युवकांनी यातील चांगली रोपे काढून गावात वाटली व गावात ठिक ठिकाणी वृक्षारोपण करुन घेतले. ग्रा.पं.ने आपली जबाबदारी पार न पाडल्याने वृक्षारोपणाचा फज्जा उडाल्याचे ग्रामस्थांमधून बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

*