वाढते प्रदुषण जागतिक पातळीवर चिंतेचा विषय : प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर

0
जळगाव |  वाढते प्रदुषण हा जागतिक पातळीवर चिंतेचा विषय झाला आहे.अशा परिस्थितीत रासायनिक उद्योगांनी एकत्रित येवून आपल्या कारखान्यांमुळे प्रदुषणात वाढ होणार नाही यासाठी काळजी घेण्यास प्रारंभ केला असल्याचे मत प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांनी व्यक्त केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेच्या वतीने आज बुधवार, दि.13 मार्च  रोजी राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्रा.माहुलीकर बोलत होते.
यावेळी मंचावर  कुलसचिव भ.भा.पाटील, राष्ट्रीय  रासायनिक प्रयोगशाळा, पुणे येथील वरिष्ठ वौज्ञानिक डॉ.बी.बी.इदगे, आय.सी.टी. मुंबई येथील प्रा.श्रीमती जे.एम.नगरकर, प्रशाळेचे संचालक डॉ.डी.एच.मोरे व समन्वयक प्रा.ए.एम.पाटील, प्रा.के.जे.पाटील उपस्थित होते.
  प्रा.माहुलीकर म्हणाले की, रसायनशास्त्रातील सर्व जण प्रदुषणासाठी कारणीभूत आहेत असा समज पसरवून त्यांना गुन्हेगार ठरविण्यात आले. मात्र वस्तुस्थिती तशी नाही, प्रत्येक जण आपल्या परीने काळजी घेत आहे. प्रयोगशाळेत देखील विद्याथ्र्यांनी जोखीम न पत्करता संरक्षणात्मक साधनांचा वापर केला पाहिजे. प्रयोगशाळेसमवेत आद्योगिक सुरक्षा देखील महत्वाची असून यातील धोक्यांची जाणीव विद्याथ्र्यांनी समजून घ्यावी असे आवाहन प्रा.माहुलीकर यांनी केले. प्रा.डी.एच.मोरे व प्रा.ए.एम.पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
  उद्घाटनानंतर डॉ.इदगे यांनी प्रयोगशाळेतील सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रा.श्रीमती नगरकर यांनी प्रयोगशाळेतील अनुत्पादनाचे व्यवस्थापन, प्रविणचंद जौन यांनी औद्योगिक सुरक्षा व धोके, डॉ.एस.बी.अत्तरदे यांनी प्रयोगशाळेत आरोग्याची सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले. पवन बाविस्कर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले. डॉ.वसीम शेख यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

*