जनआधार विकास पार्टीतर्फे भुसावळ शहरात स्वच्छता मोहीम सुरु

0
भुसावळ |  प्रतिनिधी  :  भुसावळ शहराचा अस्वच्छ शहरांमध्ये समावेश होण्याची नामुष्की शहरावर आली आहे.तीन वर्षापासून पालिकेत मुख्याधिकारी बी. टी. बाविस्कर यांच्या नाकर्तेपणामुळे शहारातील २ लाख नागरिकांचा अपमान झाला आहे.

तसेच १०० दिवसात शहराचा विकास करण्यासाठी सत्ताधारी कुचकामी ठरल्याने आहे याची नैतिक जबाबदारी स्विकारुन नगराध्यक्ष रमण भोळे यांनी राजिनामा देण्याची मागणी करुन शहराच्या स्वच्छतेसाठी अष्टभुजा मंदीरापासून स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे.

टप्प्याने शहर स्वच्छ करण्यात येणार असून सत्ताधारी विरोधी नगरसेकांचा आवाज दडपण्यासाठी गुन्हे दाखल करण्यात येत आहे. मात्र याला आम्ही घाबरत नसल्याने माजी नगरसेवक जगन सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील अष्टभुजा मंदीराजवळ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी विरोधीपक्ष गटनेता उल्हास पगारे, प्रदीप देशमुख, सामाजिक कार्यकर्ते नितीन धांडे, नगरसेवक दुर्गेश ठाकूर, राहुल बोरसे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

पालिकेवर प्रासासक नेमण्याची वेळ येवृून ठेपली आहे. याचे खापर सत्ताधारी पूर्वीच्या सत्ताधार्‍यांर फोडत आहे. शहर स्वच्छ करण्यासाठी विरोधी जनआधार विकास पार्टीतर्फे शहरात सफाई मोहिम हाती घेण्यात आली असून लवकरच नगराध्यक्ष व आमदारांच्या निवास्थानाला चपल-बुटांचा हार तसेच मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांना झाडू बांगड्यांचा आहेर देण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे.

आंदोलन करणार्‍या नगरसेवकांवर खोेटे गुन्हे दाखल करुन आवाज दडपण्याचा प्रयत्न होत आहे. शहर विकासासाठी कितीही गुन्हे दाखल झाले मातृभूमीच्या रक्षाण व शहर कचारा मुक्त करण्यासाठी प्रयत्न होणार आहे.

यासाठी दि.६ मे पासून अष्टभुजा मंदीराजवळील गंगाराम प्लॉट भागातून स्वच्छता मोहिम हाती घेण्यत आली आहे. विविध टप्प्यात शहणराची स्वच्छता करण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.

सत्ताधार्‍यांनी पत्रकार परिषदेत, पूर्वीच्या सत्ताधार्‍यांवर खापर फोडले. वास्तविक त्यांनी आपल्या नाकर्तेपणासाठी नागरिकांची माफी मगाण्याची आवश्यता होती मात्र ते माफी मागत नाही.

सत्ताधारी गेंड्याची कातडी पांघरलेले आहे. आंदोलन चिरण्याचा प्रयत्न झाल्यास जिल्ह्यात ७ठिकाणी रेल रोको आंदोलन करण्यात येईल. तसेच २ जून रोजी बहुुजन एकता मेळाव्याचे आयोजन आ.प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थिती करण्यात आल्याचे सांगितले.

आम्ही लोकशाहीच्या मार्गाने शांततेत आंदोलन केले होते यानंतर सत्ताधार्‍यांनी गुन्हे दाखल केले आहे. सत्ताधार्‍यांनी जनतेची माफी मागितली नाही. आज पासून स्वच्छता मोहिम हाती घेतली आहे.

पत्रकार परिषदेनंतर अष्टभुजा मंदीरासमोरील गंगाराम प्लॉट भागात ३.१० वाजता मोहिमेस सुरुवात करण्यात आली.

LEAVE A REPLY

*