गिरणा नदीपात्रात सांडपाणी सोडल्यास गुन्हा

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-शहरातील सांडपाणी गिरणा नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने नदीचा नैसर्गिक स्त्रोत खराब होत आहे. त्यामुळे शहरातील सांडपाणी नदीत जावू देवू नका? अन्यथा ज्याप्रमाणे दुसरीकडे आयुक्त व महापौरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे, त्याप्रमाणे तुमच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महापौर नितीन लढ्ढा व प्रभारी आयुक्त जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना दिला.
पर्यावरण मंत्री ना.रामदास कदम आज जिल्हा दौर्‍यावर होते. यावेळी महापौर नितीन लढ्ढा व प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर यांनी अजिंठा विश्रामगृहात त्यांची भेट घेतली.

ना.कदम यांच्याशी महापौर व आयुक्तांनी शहरातील समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेत शहराच्या मनपाहद्दीतील सांडपाणी शहरातलगत असलेल्या गिरणा नदीच्या पात्रात सोडले जात आहे.

त्यामुळे गिरणा नदीचे नैसर्गिक स्त्रोत दुषीत होत असल्याचे सांगितले. यावर ना.कदम यांनी सांडपाणी नदीत सोडण्यावर आळा घाला अन्यथा ज्याप्रमाणे दुसरीकडे आयुक्त व महापौरांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

त्याप्रमाणे तुमच्यावर देखील गुन्हे दाखल करण्यात येईल. असा इशारा त्यांनी महापौर व आयुक्तांना दिला. तसेच शहारात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी प्रस्ताव पाठवा निधी मिळवून देतो असल्याचे ना.कदम यांनी सांगितले.

याबाबत महापौर व प्रभारी आयुक्त यांनी अमृत योजने अंतर्गत भूमीगत गटारीच्या प्रकल्प व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प मंजूर झाले असून लवकरच कामाला सुरवात होणार असल्याचे सांगितले.

तसेच शहरातील 70 ते 80 टक्के सांडपाणी नाल्याद्वारे शेतीसाठी वापरले जात असल्याची माहिती ना.रामदास कदम यांना देण्यात आली.

 

LEAVE A REPLY

*