मनपाला मिळालेला 108 कोटीचा निधी परत जाण्याची शक्यता

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-मनपाला विकास कामे करण्यासाठी शासनाकडून विविध 40 प्रकारांमधून निधी दिला जात असतो. परंतू या निधीचा वापर योग्य प्रकारे होत नसून त्याचा खर्च देखील करण्यात आलेला नाही.
हा खर्च न झालेला निधीची माहिती राज्यशासनाकडून मागविण्यात आली असून मनपाला मिळालेल्या 108 कोटीचा निधी शासनाकडे परत जाण्याची शक्यता मनपातील सुत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.
राज्य शासनाकडून महापालिकांना शहरात विकास कामांसाठी आमदार, खासदार, शहर विकार, नगरविकास, 13 वित्तीआयोग, आदी वित्तीय आयोग पकडून जवळपास 40 प्रकारचे निधी मिळत असतात.

परंतू अनेक महापालिकेकडून हा निधी खर्च न होता अनेक वर्ष तसाच पडलेला असतो. अशा निधींचा माहिती राज्यशासनाकडून माहिती मागण्यात आली आहे.

तसेच हा निधी परत शासनाकडे वर्ग केला जाणार असल्याची शक्यता आहे. त्यात जळगाव महापालिकेकडे विविध प्रकारातून जवळपास 108 कोटीचा निधी हा खर्च न झाल्याने पडून आहे.

त्यामुळे आधीच शहर विकासाला निधी नाही म्हणून सांगत असलेले पदाधिकारी व आधिकारी यांना या निधीची वापर केलेला नाही.

त्यामुळे मनपा जवळ 108 कोटीचा निधी असून ही शहरात विकास कामे करण्यात आले नसून हा निधी आता परत जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

 

LEAVE A REPLY

*