जिल्ह्यात एमपीडीएचे पाच प्रस्ताव

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-जिल्ह्यात 2100 प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव विचाराधीन असून यात पाच एमपीडीएचेही प्रस्तावांचा समावेश असल्याची माहिती पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी आज पत्रकारांशी बोलतांना दिली.
आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्याच्या अनुषंगाने आज नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांनी जिल्ह्याचा आढावा घेतला.

या बैठकीस पोलीस अधीक्षकांसह, जिल्ह्यातील विभागीय अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक तसेच प्रभारी उपस्थित होते. बैठकीबाबत माहिती देतांना पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी सांगितले की, जानेवारी ते जून या सहा महिन्यांचा त्यांनी गुन्हेगारी प्रतिबंधत्माक कारवाई संदर्भात माहिती जाणून घेतली.

तसेच जळगाव जिल्हा पोलीस दलाने घेतलेल्या रोजगार व्यवसाय मेळाव्याबद्दल माहिती आयजींनी घेतली, असेही पोलीस अधीक्षक कराळे यांनी सांगितले.

जिल्ह्यात 2100 प्रतिबंधात्मक कारवाईचे प्रस्ताव विचाराधीन असून हद्दपारी, एमपीडीएचे पाच प्रस्ताव लवकरच जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात येणार आहेत. चोरटी वाळुची वाहतूक, अवैध दारू विक्री आणि समाजाला धोकेदायक ठरणार्‍या व्यक्तींविरोधात पोलीस प्रशासन कारवाई करणार असून जे वाळू व्यावसायिक अवैधरित्या वाळुची वाहतूक करतील, अशांचे शस्त्र परवाने रद्द केले जातील, असेही पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट केले.

भादली हत्याकांडाबाबत दोन दिवसात अहवाल
भादली येथील हत्याकांडप्रकरणी दोन दिवसात अहवाल प्राप्त होणार असून त्यानंतर पुढील कारवाई होईल, असे पोलिस अधीक्षक कराळे यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*