हिंदूत्ववादी संघटनांकडून चायना वस्तूंची होळी

0
जळगाव । दि.12 । प्रतिनिधी-भारतीय सीमेवर चीनकडून वाढत असलेली दादागिरी, तसेच शत्रू राष्ट्राला देत असलेल्या पाठिंब्याबाबत चीनला धडा शिकविण्यासाठी चायना वस्तूंच्या विक्री बंद आंदोलनात शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांकडून आज चायना वस्तूंची होळी करण्यात आली.
महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ आज दुपारी साडेचारला राष्ट्रीय हिंदू आंदोलन समिती, विश्व हिंदू परिषद तसेच आदी संघटनांतर्फे चिनी वस्तूंची होळी करण्यात आली.

यावेळी उपस्थितांकडून चिनविरोधात घोषणाही देण्यात आल्या. नागरिकांसह व्यापार्‍यांना चिनी वस्तू न वापरण्याबाबत जनजागृती करण्यात आली.

यावेळी महापालिका भाजपचे गटनेते सुनील माळी, मोहन तिवारी, परेश सिनकर, गणेश शेटे, मनोज चौधरी, सागर सोनवणे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*