वेल्हाळा तलावावर आढळला धोकाग्रस्त चित्रबलक

0
खडका ता.भुसावळ । दि.12 । वार्ताहर-येथून जवळच असलेल्या वेल्हाळा तलावात धोकाग्रस्त स्थितीतील चित्रबलक (प्रिंटेड स्पार्क) या पक्षांचा थवा मुक्त संचार करीत असून वास्तव्यास असल्याचे परिसरात काम करणार्‍या मजूरांना दि.11 रोजी आढळून आला.
वेल्हाळा गावाजवळ जंगल क्षेत्र असल्याने विविध वन्य प्राण्यांसह पक्षी या परिसरत आढळून येतात. याचप्रमाणे मुख्यत: बिहार राज्यात आढळणारा व धोकाग्रस्त पक्षी तलवावर आढळून आल्याने अश्चर्य व्यक्त होत आहे.

या पक्षाची प्रजाती नष्ठ होण्याच्या मार्गावर असल्याने त्यांची गणना धोकाग्रस्तपक्षांमध्ये करण्यात आली आहे. तलावावर मोठ्या प्रमाणात थवा आढळून आल्याने त्यांचे वास्तव्य परिसरात असल्याचा अंदाज आहे.

चित्रबलक या पक्षांची घटरे नसतात व ते पावसाळ्याच्या दिवसात झाडावर अंडी देतात. यांचे आपल्याकडे फारसे वास्तव्य नसले तरी परिसरातील वास्तव्य पाहता हतनूर सह परिसरात पक्षांची अंडी असल्याचा अंदाज असून त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे चातक नेचर कंझरर्व्हेशन संस्थेचे अध्यक्ष अनिल महाजन यांनी सांगितले.

प्रमुखत: बिहार राज्यातील ही प्रजाती खाद्याच्या शोधार्थ इतरत्र भटकतांना दिसते. ते उथळ पाण्याच्या ठिकाणी आढळून येतात पाण्यातील झिंगे, पाण किटक, मासे हे त्यांचे प्रमुख खाद्य आहे.

 

 

 

 

LEAVE A REPLY

*