मसाकाचा मार्ग मोकळा

0
यावल । दि.12 । प्रतिनिधी-मधुकर सहकारी साखर कारखाना फैजपूर संदर्भात ‘दखल मसाकाची’ ही मालिका दै. देशदूत ने ठळक 12 दिवस वेगवेगळे विषय घेवून प्रकाशित केली होती.
त्यामुळे जिल्हा बँकेकडून माजी आ.एकनाथराव खडसे यांचे संचालक जिल्हा बँक गणेश नेहेते यांनी वेधून मार्च 18 पावेतो थकहमीची शिफारस केली होती.
त्यामुळे शासनाकडून बाहेरील कर्ज उभारणीसाठी संचालकांनी स्वतःची मालमत्ता बँकेत गहाण ठेवल्याची हमी घेतली होती. मात्र शासनाकडून पत्र मिळाले नव्हते.
मात्र कारखाना कार्यक्षेत्रात 4200 हेक्टर ऊस लागवड झाली असल्याने मसाकाला थकहमीची मार्च 18 पावेतो मुभा देणेसाठी संचालक जिल्हा बँक गणेश नेहेते यांनी बाजू लावून धरली.
त्या संदर्भात मसाका चेअरमन शरद महाजन व संचालक मंडळ यांनी आ.खडसे यांचेकडे विनंती केली होती. त्यानुसार आ.खडसे यांनी अभ्यास करून थकहमीसाठी पाठपुरावा केला व बँकेनेहमी घेतली त्यामुळे कामगारांचे व शेतकर्‍यांचे ऊसाचे पैसे देण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला.

कामगारांच्या संपामुळे एक पगार अगोदर संचालक मंडळाने दिला व आता 2 पगार टाकण्यात आले. तर ऊसाचे शेतकर्‍यांचे प्रतिटन 100 रूपये टाकले होते.

येत्या दोन दिवसात शेतकर्‍यांचे ऊसाचे प्रतिटन 200 रूपये खात्याव विनाकपात टाकण्यात येत आहेत, अशी माहिती चेअरमन शरद महाजन व व्यवस्थापकिय संचालक श्री.सगरे यांनी दै.देशदूतशी बोलतांना सांगितले.

कामगारांचा संप, ऐन पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने शेतकरी वर्ग बेचैन झालेला आहे. त्यात मसाकाने शेतकर्‍यांना प्रतिटन दिलेले त्यांचे हक्काचे पैसे त्यामुळे समाधान व्यक्त होत असून शेतकरी वर्ग आनंदीत आहे.

 

LEAVE A REPLY

*