वरणगावात महिलेवर प्राणघातक हल्ला

0
वरणगाव, । दि.12 । वार्ताहर-येथे अज्ञात इसमाने महिला शौचालयात जावुन एका महिलेवर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात प्राणघात हल्ला करुन पसार झाला. त्याचा वरणगाव पोलीस शोध घेत आहे.
वरणगाव पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, पिडीत महिलेच्या फिर्यादिवरून दि. 13 रोजी पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास फिर्यादी महिला प्रातःविधी करिता खिडकी वाड्यासमोरील भोगावती नदीपात्रातील नगरपरिषदेच्या सार्वजनिक शौचालयात एकटीच गेली असता टी शर्ट, भुरकट रंगाची सुटपँट, गोर्‍या रंगाचा, ठेंगण्या बांध्याचा अशा वर्णनाच्या अज्ञात इसमाने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून प्राणघातक हल्ला केला व संशीयत घटनास्थळावरून पसार झाला.

सदर महिला त्याच जखमी अवस्थेत घरी जावुन पतीकडे घडलेली सर्व हकीगत सांगीतली असता तीच्या पतीने तिला उपचारार्थ खाजगी रुग्णालयात दखल केले.

वरील घटना शहरात वार्‍या सारखी पसरताच वरणगाव पोलीस स्टेशनचे एपीआय जगदीश परदेशी, पीएसआय निलेश वाघ, प्रविण ठुबे, पोहेकॉ सुनिल वाणी, मेहरबान तडवी यांनी घटनास्थळावर जावुन पंचनामा केला व महिला दाखल असलेल्या रुग्णालयात जावुन जखमी माहिलेचे जाबजबाब नोंदवुन भाग 5 गु.र.नं. 41/17 नुसार भा.दं.वि. 354, 324 प्रमाणे गुुन्ह्यांची नोंद करण्यात आली. तपास पीएसआय प्रविण ठुबे, पोहेकॉ सुनिल वाणी, मेहरबान तडवी करीत आहे.

 

 

LEAVE A REPLY

*