मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी ‘एक दिवा लेकी’साठी कार्यक्रम

0
जळगाव । दि.11 । प्रतिनिधी-कोपर्डी येथील एका युवतीवर अत्याचार झाल्याच्या घटनेला एक वर्ष पुर्ण होत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चातर्फे दि. 13 रोजी सायंकाळी 6 वाजता काव्यरत्नावली चौकात ‘एक दिशा लेकी’साठी श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती प्रा. डी. डी. बच्छाव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कोपर्डीची घटना घडल्यानंतर घटनेच्या निषेधार्थ मराठा समाजातर्फे क्रांती मोर्चातर्फे मुक मोर्चाचे आयोजन करुन निषेध व्यक्त करण्यात आला होता.

तसेच घटनेतील आरोपींना कडक शिक्षा व्हावी ही मागणी देखील निवेदनाद्वारे करण्यात आली होती. यावेळी शासनाने जलद न्यायालयात हा खटला सुरु असून 6 महिन्यात पिडीत युवतीच्या कुटुंबाला न्याय देण्याची घोषणा केली होती.

परंतू या घटनेला वर्ष पुर्ण झाले तरी न्याय मिळालेला नसून शासनाने केलेली घोषणा पोकळ ठरली असून शासन वेळकाढूपणा करीत आहे.

त्यांच्या या वेळकाढूपणाच्या वृत्तीला लगाम लावण्यासाठी शहरातील, गावांतील प्रमुख चौकांचौकांमध्ये सर्व समाजबांधवांनी एकत्र येवून एक दिवा प्रज्वलीत करुन श्रद्धांजलीपर संवेदना व्यक्त करावयाच्या आहेत.

यावेळी कोणत्याही प्रकारची प्रार्थना, घोषणा दिली जाणार नसून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही. याची काळजी घ्यावयाची असून शांततेच्या मार्गाने श्रद्धांजलीपर संवेदना व्यक्त करावयाच्या आहेत.

सर्व समाजबांधवांनी व महिलांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.

यावेळी बाळासाहेब सुर्यवंशी, डॉ. राजेश पाटील, संगीता पाटील, लिना पवार, चंद्रकांत कापसे, श्रीराम पाटील, अ‍ॅड. विजय पाटील, किरण साळुंखे, विकास पवार, संजय पवार, विकास नरवाडे, भिमराव मराठे, सचिन सोमवंशी, संदेश भोईटे, प्रमोद पाटील, अ‍ॅड. सचिन चव्हाण, श्रद्धा पाटील, विलास भाऊसाहेब, राम पवार, रवी देशमुख, विनोद देशमुख, प्रा. सुनिल गरुड, अ‍ॅड. गोपाल जळुकर, प्रा. राजेंद्र देशमुख, राजेश पाटील, योगेश पाटील यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काळ्या फिती लावून निषेध करण्याचे आवाहन
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ सर्व समाजबांधवांनी आपल्या नोकरीच्या ठिकाणी, विद्यार्थ्यांनी शाळा, महाविद्यालयात, शेतकर्‍यांनी शेतात तर डॉक्टर, वकील, अधिकारी, कर्मचारी, व्यावसायीक, उद्योजक यासह गृहीणी महीलांनी घरात आपल्या उजव्या हाताच्या दंडाला काळी रिबीन बांधून घटनेचा निषेध करण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चातर्फे करण्यात आले आहे.

पिडीताच्या कुटुंबीयांना रवी देशमुख यांच्या कडून आर्थिक मदत
कोपर्डी घटनेतील पिडीत युवतीच्या कुटुंबीयांना आसोदा – ममुराबाद गटाचे जिल्हा परिषद सदस्य पल्लवी पाटील यांचे पती रवी देशमुख यांच्याकडून दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केले.

 

LEAVE A REPLY

*