सेवानिवृत्त परिचारीकेच्या घरात घरफोडी

0
जळगाव । दि.11 । प्रतिनिधी-शहरातील आदर्शनगरातील निवृत्त परिचारिकेच्या घरात घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत चोरट्यांनी 13 हजार रुपयांची रोकड लंपास केली. दरम्यान याप्रकरणी निवृत्त परिचारकेच्या फिर्यादीवरुन रामानंद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सेवानिवृत्त परिचारीका उषत्त छगन पंतगपुरे या आपल्या कुटुंबियांसह हरीविठ्ठल नगरात वास्तव्यास आहे.

त्यांचे आदर्श नगरात देखील एक घर असून त्याठिकाणी पिठाची गिरणी आहे. ही पिठाची गिरणी उषा पतंगपुरे यांचे पती छगन पतंगपुरे हे चालवित असून याठिकाणी कोणीही वास्तव्य करीत नाही.

दरम्यान आज सकाळी छगन पतंगपुरे हे नेहमी प्रमाणे गिरणीवर आले असता त्यांना घराचे कुलुप तोडलेले दिसून आले. यावेळी त्यांनी घरात प्रवेश करुन बघितले असता त्यांना घरातील साहित्य अस्ताव्यस्त फेकले असल्याचे दिसून आले.

दरम्यान नुकतीच झालेली पेन्शनचे 9 हजार व आधीच असलेले 4 हजार असा एकूण 13 हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

दरम्यान छगन पतंगपुरे यांनी तात्काळ रामानंद पोलिसात धाव घेवून अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पुढील चोरीचा तपास रामानंद पोलिस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.

 

LEAVE A REPLY

*