आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार

0
जळगाव । दि.11 । प्रतिनिधी-विद्यार्थ्यांनी आपल्या करीयर निवडतांना योग्य करीयर निवडले पाहिजे. पोलिसांच्या पाल्यांचे शिक्षण पुर्ण होते.
परंतू त्यांना योग्य दिशा मिळत नसल्याने त्यांच्या करीयरचे मार्ग चुकत असतात. त्यामुळे करीयर करतांना योग्य मार्ग निवडा कारण आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी व्यक्त केले.

जळगाव जिल्हा पोलीस व जिल्ह कौशल्य विकास योजना व उद्योजक मार्गदर्शन केंद्र जळगाव यांच्या संयुक्तविद्यामाने पोलीसांच्या पाल्यांसाठी पोलीस मुख्यालयातील मंगलम सभागृहात रोजगार मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते.

मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन करण्यात आले़ यावेळी व्यासपिठावर पोलीस अधिक्षक दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस अधिक्षक बच्चन सिंग, पोलीस उपअधिक्षक (गृह) रशीद तडवी, जिल्हा कौशल्य केंद्राचे उपसंचालक अनिसा तडवी, ए़ आऱ खैरनार उपस्थित होते़ पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले की, नोकरी करत असतांना पालकांकडून आल्या पाल्यांकडे दुर्लक्ष होत असते.

त्यामुळे योग्य पोलिसांच्या पाल्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे़ तसेच कोणत्याही क्षेत्रात नोकरी, व्यवसाय करा परंतू तो सवोर्र्त्कृष्ट करा असा संदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिला.

त्यानंतर मेळाव्यात मार्गदर्शन करतांना पोलिस अधिक्षक म्हणाले की, तुम्ही खुप नशिबवान आहात. तुमच्या करीयरसाठी तुम्हाला या प्रकारच्या संधी चालुन येत आहेत. मेळाव्यात अनेक नामांकीत कंपन्या आल्या असून भविष्यात या कंपन्यांची व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे श्री. कराळे यांनी सांगीतले.

सूत्रसंचालन पो. ना. विनोद अहिरे यांनी केले. यशस्वीतेसाठी पो.नि. श्रीकांत घुमरे, पोहेकॉ़ रावसाहेब गायकवाड, पो.नि. सतिष देसले, पो.कॉ. शांताराम सोनवणे, पो.कॉ.जितेद्र चौधरी, जयंत चौधरी यांनी परिश्रम घेतले.

या कंपन्यांनी घेतला सहभाग
मेळाव्यामध्ये डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टन्ट फिनिशींग स्कूल,पुणे, स्मार्ट कन्सल्टन्सी, बडोदा.शोध अडव्हान्टेज औरंगाबाद, नवकिसान बायो पॅन्टेच, जळगाव, डेक्कन मॅनेजमेंट कन्सल्टन्ट फिनिशींग स्कूल, औरंगाबाद,स्पेकट्रम इलेक्ट्रकल्स कंपनी जळगाव व आयटीएम स्कील्स अकॅडमी नागरपूर यासह अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी आले होते.

232 उमेदवारांना मिळणार रोजगार
पोलिस पाल्यांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात जळगाव, धुळे, नंदुरबार येथून उमेदवार सहभागी झाले होते. या रोजगार मेळाव्यातून 232 उमेदवारांना रोजगार मिळणार आहे.

मेळाव्यात 522 उमेदवारांची निवड
पोलिस पाल्यांसाठी आयोजीत करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांमधून प्राथमिक फेरीत 522 उमेदवारांची निवड करण्यात आली असून त्यानंतर 10 च्या गटानुसार नोंदणी करुन मुलाखती घेण्यात आल्या.

 

 

LEAVE A REPLY

*