जामनेर पाचोरा पीजीने आज गाठली शंभरी

0
बोदवड | प्रतिनिधी : स्वातंत्र्य पुर्व काळात ब्रिटीशांनी ११ जुलै १९१७ मध्ये सुरू केलेल्या जामनेर पाचोरा या पीजी रेल्वेने आज ११ जुलै २०१७ रोजी शंभरी गाठली आहे.

११ जुलै १९१७ रोजी ब्रिटीशांनी जामनेर ते पाचोरा हा नॅरोगेज रेल्वे मार्ग सुरू केला होता.

बोदवड भुसावळपर्यत वाढविण्याची मागणी अपूर्णच

दरम्यान १९१७ मध्ये या मार्गावरून केवळ मालवाहतुक होत होती. नंतर प्रवासी वाहतुक ही सुरू केली. तेव्हा पासून हा मार्ग लोकांच्या पसंतीस उतरलेला आहे. आजही या रेल्वेने हजारो प्रवासी प्रवास करत आहेत.

दरम्यान या मार्गाचे ब्रॉड गेज मध्ये रूपांतर करून हा मार्ग बोदवड, नाडगाव किंवा भुसावळ पर्यंत वाढविण्याची मागणी होत आहे. असे असले तरी हा लोहमार्ग व ही रेल्वे अजुनही करारानुसार ब्रिटीशांच्याच मालकीची असून रेल्वेचू उत्पन्न ब्रिटीश सरकारला जात असल्याची माहिती मिळते.

LEAVE A REPLY

*