लॅपटॉपनंतर आता रोलटॉप

0
संगणकाचा शोध लागला तेव्हा केवळ डेस्कटॉप ही एकच संकल्पना ज्ञात होती. नंतर कालांतराने बदल होऊन डेस्कटॉपची जागा लॅपटॉपने घेतली. यामुळे कोणत्याही ठिकाणाहून केव्हाही काम करणे अधिक सोपे झाले. यातही तंत्रज्ञानात सतत होणार्‍या बदलांनी नोट, टॅब, स्मार्ट फोन अशी उपकरणेही मार्केटमध्ये लोकप्रिय झाली.

मात्र प्रत्येकाला हे सर्वच साधने एकाचवेळी वापरणे शक्य होत नाही. यावर पर्याय म्हणून आता चक्क रोल टॉप मार्केटमध्ये लॉंच होण्याच्या तयारीत आहे.

सध्या रोल टॉपचे व्हिडीओ यु ट्युब आणि व्हॉट्सऍपवर व्हायरल होत आहे. तर शास्त्रज्ञांकडून मात्र रोल टॉप मार्केटमध्ये येण्यास ३ ते ४ महिन्यांचा कालावधी लागू शकतो असे म्हटले जात आहे. रोल टॉपम्हणजे लॅपटॉप प्रमाणे कुठेही आणि केव्हाही काम करण्याची सुविधा आहेच.

शिवाय लॅपटॉपप्रमाणे मोठी बॅग वापरण्याची गरज भासणार नाही. एका पाण्याच्या बाटलीच्या आकाराप्रमाणे घडी करून ठेवता येण्याइतपत हा रोलटॉप पोर्टेबल राहणार आहे. घडी करता येणार्‍या रोल टॉपचे वैशिष्टये म्हणजे १७ इंच स्क्रीन आणि यातच असलेले स्मार्ट फोन फंक्शन, टॅब, नोट देखील वापरता येण्याची सोय आहे. यामुळे सर्वच कामे एकाच स्क्रीन वर करता येऊ शकतात.

तंत्रज्ञानात होत असलेला बदल रोलटॉपवर दिसून येऊ शकतो. अद्याप याची किंमत जाहीर करण्यात आली नसली तरी लॅपटॉपच्या किंमतीमध्येच उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे मोठी बॅग न वागविता केवळ हँड बॅगप्रमाणे गळ्यात लटकवून देखील रोलटॉप वापरता येऊ शकते.

विशेष म्हणजे किबोर्ड देखील असले तरी टचस्क्रीनचा वापरही यात देण्यात आला आहे. यामुळे सर्वच सुविधांनी युक्त असलेला हा रोलटॉप मार्केटमध्ये लॉंच होण्याची जोरदार तयारी सुरु आहे. घडी केल्यानंतर पाण्याच्या क्षबाटलीच्या आकाराचा दिसणारा रोल टॉप उघडल्यानंतर संपुर्ण कॉम्प्युटरप्रणालीप्रमाणेच काम करु शकतो.

याला युएसबी कनेक्टर, ऍटोमॅटीक बटन सिस्टीम, स्क्रीन, स्पीकर, कि बोर्ड, माऊस अशी सर्वच सुविधा देखील पोर्टेबलच आहे हे विशेष.

LEAVE A REPLY

*