झोपेवर नियंत्रण ठेवणारे स्मार्ट बँड

0
शिओमी या चिनी कंपनीने आता चक्क झोपेवर नियंत्रण ठेवणारे स्मार्ट बँड विकसित केले आहे. एमआय वन एस या नावाने हे बँड विकसित केले असून यातून झोपेवर नियंत्रण ठेवता येऊ शकते असा दावा कंपनीने केला आहे.

स्मार्ट जगतात सध्या अनेक कंपन्यांनी अनेक फिटनेस ट्रॅकर बाजारात आणले आहे. यात आतापर्यंत उपलब्ध असलेले ब्लडप्रेशर कंट्रोलर, पायी चालतांना अंतर मोजणे अशी अनेक उपकरणे बाजारात उपलब्ध आहेत.

या उपकरणांमध्ये झोपेवर नियंत्रण ठेवणारे स्मार्ट बँड आता शिओमी कंपनीने विकसित केले आहे. मानवी जीवनाला दैनंदिन कामकाजासोबतच पुरेशी झोपही गरजेची असते. मात्र काहींना जास्त झोपेची तर काहींना कमी झोपेची सवय असते. यामुळे फिटनेस राखणे शक्य होत नाही.

यावर नियंत्रण ठेवण्यासाठीच आता हे स्मार्ट बँड बाजारात आणले असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. शिओमी कंपनीने यापुर्वी फिटनेस बँड सादर केले होते. आता यातीलच एक म्हणजे एमआयबँड वन एस हे टॅ्रकर सादर केले आहे.

याचे वैशिष्ट्ये म्हणजे ते आधीच्या बँड प्रमाणे रक्तदाबावर नियंत्रण, चालतांना अंतर मोजणे यासोबतच झोपेवर नियंत्रणठेवण्याचे काम करते. विशेष म्हणजे हा बँड अँड्राईड आणि आयओएस स्मार्टफोनसोबत कनेक्ट करता येऊ शकतो. सोबतच वॉटरप्रुफही असल्याने हा बँड लोकप्रिय होईल अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

*