पेट्रोलपंप लुटणार्‍या टोळीचा पर्दाफाश

0

जळगाव / रामानंदनगर पोलीसांनी घरफोडीतील सराईत गुन्हेगार सोपराजा याला ताब्यात घेतले.

त्याच्या दुसर्‍या साथीदाराला जळगावातील आदर्श हॉटेलसमोरुन गावठी पिस्तुल अटक करण्यात आली आहे.

त्याने नाशिक जिल्ह्यासह इतर पेट्रोलपंप लुटल्याचे कबुली दिली असून त्याचा उर्वरीत आठ साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढलेल्या घरफोडीचे गुन्हे उघडकिस येत नसल्याने डीवायएसपी सचिन सांगळे यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचार्‍यांना धारेवर धरले होते.

घरफोडीतील संशयीतांचा शोध घेत असतांना पोना. प्रदीप चौधरी यांना सोपराजा याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार सोपराजा उर्फ राजेंद्र दत्तात्रय गुरव याला अटक करण्यात आली.

त्याने चार घरफोडी केल्याचे कबुल करीत सुमारे 1 लाख 50 हजाराचा मुद्देमाल काढुन दिला. पोलीस कोठडीत जिल्हापेठ पोलीस ठाण्यातील गुरनं 31/2017 मधील दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

तसेच नाशिक येथील इंदीरानगर येथील 1 लाख 70 हजार रुपयांची घरफोडी केल्याचे सोपराजा यांने कबुल केले.

सोपराजाचा दुसरा साथीदार गजाआड
नाशिक येथील घरफोडीतील सोपराजाचा साथीदार राहुल संदीप सोनवणे (रा.सिन्नर, नाशिक) हा जळगाव आल्याची गुप्त माहिती मिळाली.

त्यानुसार आदर्श हॉटेलजवळ सोनवणे आल्याची माहिती पोना.चौधरी यांना मिळाली.

पथकाने आदर्श हॉटेलजवळुन सोनवणे याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून बनावट पिस्तुल मिळून आले.

त्याच्याविरुध्द रामानंदनगर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरोड्यासह पेट्रोपंप लुटीचे गुन्हे
नाशिक येथील राहुल सोनवणे याने संगमनेर येथे दि.2 मे रोजी पेट्रोलपंप लुटून 7 लाख 17 हजाराच ऐवज लंपास केला असून यावेळी त्याच्यासोबत आठ साथीदार होते.

तसेच औरंगबाद जिल्ह्यातील वाईन शॉप बंदुकीचा धाक दाखवून 3 लाख 50 हजाराचा ऐवज लुटला.

राहुल याच्यावर नाशिक येथे सुमारे 14 घरफोड्या दाखल असुन त्याने आठ बनावट पिस्तुलही काढुन दिल्या आहेत.

तसेच त्याच्याविरुध्द चोपडा ग्रामिण येथे दरोडाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल असून अकोला येथे दरोडा प्रयत्न, लासलगाव येथे दरोडा गुन्हा दाखल आहे.

संशयित आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*