भुसावळ : पिकांची वाढ खुंटली

0
निरज वाघमारे |  भुसावळ  :  तालुक्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी अद्याप समाधानकारक पाऊस नसल्याने पीक स्थिती नाजूक आहे. आठवडाभरात समाधानकारक पाऊन न झाल्यास दुबार पेरणीची स्थिती उद्भवण्याची चिन्हे आहे.

तालुक्यातील २८ हजार ५५९ हेक्टर क्षेत्रापैकी २३ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. पाऊस नसल्याने पीकांची वाढ खुंटल्याचे चित्र आहे याचा परिणाम बागायती क्षेत्रावरही जाणवत आहे. आठवड्या भरात पाऊस न झाल्यास तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुबार पेरणीचे संकट समोर येणार आहे.

मृगनक्षत्राच्या सुरुवातीपासून आतापर्यंत फक्त ८ दिवस पाऊस झाला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला दोन दिवस झालेल्या पावसात तर जुलै महिन्यात झालेल्या पावसात शेतकर्‍यांनी पेरणी केली आहे. या पेरणीनंरत पावसाने डोळे वटारल्याने आता मात्र पीकांना उन्हाची व वातावरणाची झळ जाणवत असून पीकांची वाढ खुंटली आहे.

सद्या तालुक्यात दुबार पेरणी झाली नसली तरी तीनशेहून अधिक हेक्टर क्षेत्रात दुबार पेरणीची स्थिती आहे. आणखी आठवडाभर पावसाने दडी मारल्यास या क्षेत्रात आणखी वाढ होऊन मोठ्या प्रमाणात दुबारची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकरी मात्र चिंतातुर झाला आहे.

सद्या काही पिकांवर फवारणीची आवश्यकता आहे. पेरणी झालेल्या २३ हजार हेक्टर क्षेत्रातील १० हजार ३१ हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. त्यात कोरडवाहू ५हजार ७९३ हेक्टर तर बागायती ४ हजार २३८ हेक्टरचा समावेश आहे. अन्य पिकांमध्ये,मका १ हजार२८० हेक्टर, ज्वारी १ हजार ८२६, सोयाबीन ११७०, तर १हजार ९०० हेक्टर क्षेत्रात तुर, मुग, उडीद, भुईमुंम तीळ पीकांची पेरणी झाली आहे.

बारामाही पीकांमध्ये उस ९३ तर केळी ३२२ हेक्टर या पीकांचा सामवेश आहे. कांदे व भाजीपाला पीकांची लागवडीचे क्षेत्र अद्याप खालीच आहे.

LEAVE A REPLY

*