पोषण आहाराच्या तपासणीचे सीईओंचे आदेश

0
जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या निकृष्ट शालेय पोषण आहार प्रकरणी शिक्षण विभागाने निकृष्ट माल प्राप्त झालेल्या शाळांमधील माल ठेकेदाराकडून बदलला नाही.
त्यामुळे आज सीईओ कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये पोषण आहाराच्या मालाची तपासणी करण्याचे आदेश आज दिले असून निकृष्ट माल आलेल्या शाळांचा अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान येत्या दोन दिवसात भुसावळ तालुक्यातील सहा शाळांचा माल बदलून देण्याबाबत सूचना केल्या आहेत.
भुसावळ तालुक्यातील गोजोरे,मोंढाळा,खंडाळा,कुर्‍हा,साक्री,वांजोळा या शाळांमध्ये पोषण आहाराचा निकृष्ट माल आल्याची तक्रार आल्यानंतर सीईओनी पंचनामा करण्याचे आदेश दिले होते.

मात्र पंचनामा होवून आठवडा होवूनदेखील या शाळांमधील माल बदलण्यात आला नसल्याने विद्याथ्र्यांना तोच आहार दिला जात असल्याची तक्रार आल्याने सीईओंनी आज सर्वच शाळांमध्ये पोषण आहाराच्या धान्यादी मालाचे तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.

केंद्रप्रमुखांकडुन तपासणी – सीईओंनी प्रत्येक तालुक्यातील केंद्रप्रुखाच्या अखत्यारीत येणार्‍या शाळांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.

या समितीत गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख ज्या त्या शाळेचे मुख्याध्यापक व शाळांमधील व्यवस्थापन समितीचे सदस्य अथवा अध्यक्ष यांचा समावेश असणार आहे.

अहवाल दोन दिवसात येणार – ज्या शाळांमध्ये निकृष्ट पोषण आहार आला आहे त्याची तपासणी होणार आहे. त्यानंतर प्रत्येक शाळेचा अहवाल तालुकास्तरावरून पाठविण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*