भादली हत्याकांडाचा तपास थंडबसत्यात

0
जळगाव । प्रतिनिधी-जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे दि.20 मार्च रोजी भोळे कुटूंबियातील चौघांची निर्घुण हत्या झाली. हत्याकांडाच्या घटनेला तीन महिने उलटूनही तपास मात्र थंडबसत्यात आहे.
भादली बुद्रुक येथील भोळे वाड्यातील एकाच कुटुंबातील प्रदीप भोळे, संगीता भोळे, दिव्या भोळे, चेतन भोळे या चौघांची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली.
मात्र पोलीस प्रशासन अद्यापही मारेकर्‍यांच्या शोध घेवू शकले नाही. मारेकरी शोधण्यासाठी पोलीस प्रशासनाने सुरुवातीला 25 हजाराचे आणि त्यानंतर 50 हजाराचे बक्षीस जाहीर केल्यानंतरही पोलीस प्रशासनाला यश येवू शकले नाही.

त्यामूळे हत्येचे कारण शोधण्यासाठी आणि मारेकर्‍यांच्या शोध घेण्यासाठी पोलीसांसमोर आव्हाण ठेपले आहेे.

ब्रेन मॅपिंग अहवालाची प्रतिक्षा
भादली हत्याकांड प्रकरणी जवळपास 100 ते 125 ग्रामस्थांचे पोलीसांनी जाबजबाब घेतले. यातील सहा जणांची दि.19 ते 23 जून दरम्यान ब्रेन मॅपिंग व लाय डिटेक्टर चाचणी मुंबई येथे करण्यात आली. मात्र अद्यापही अहवाल प्राप्त झालेला नाही.

ग्रामस्थ दहशतीच्या छायेत
मारेकर्‍यांचा शोध घेण्यासाठी गावातील अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेत असल्याने ग्रामस्थांमध्ये भिती निर्माण झाली असून ग्रामस्थ पोलीसांच्या दहशतीखाली असल्याचे बोलले जात आहे.

पालकमंत्र्यांचे दुर्लक्षच
जळगाव जिल्ह्यात सामूहिक हत्याकांडाची पहिली घटना घडली. परंतु अद्यापही पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी भादली येथे जावून भेट दिली नाही. घटनेचा तपास करुन लवकरच मारेकर्‍यांचा शोध घेण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले होते. मात्र तीन महिने होवूनही अद्यापही तपास लागलेला नाही.

 

 

LEAVE A REPLY

*