मनपाच्या शाळांची दुरावस्था

0
जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-सुप्रिम कॉलनीत असलेल्या महानगरपालिकेची शाळा क्र.32 मध्ये भाजपचे गटनेते सुनिल माळी आणि नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी सकाळी अचानक भेट देवून पाहणी केली.
दरम्यान, शाळेत कुठल्याही विद्यार्थ्यांना सुविधा नसल्याचे तसेच बालवाडीतील विद्यार्थ्यांना दिली जाणारी खिचडी बेचव असल्याचे निदर्शनास आले.
महानगरपालिकेच्या शहरात शिक्षण मंडळांतर्गत 34 शाळा आहेत. तर मराठी माध्याम 13 आणि सेमी इंग्रजी माध्यमाच्या 19 अशा एकूण 32 बालवाड्या आहेत.

आर्थिक दुर्बल घटकातील मुलांना शिक्षण घेता यावे, यासाठी प्रशासनामार्फत लाखो रुपये खर्च केल्याचा दावा करण्यात येत आहे.

मात्र दुसरीकडे मनपाच्या शाळांची दयनीय अवस्था झाली आहे. सुप्रिम कॉलनीतील मनपा शाळा क्र.32 मध्ये भाजप गटनेते सुनिल माळी, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी अचानक भेट देवून पाहणी केली. दरम्यान, त्यांना अनेक धक्कादायक बाबी निदर्शनास आल्या.

एकाच खोलीत सर्व वर्गाचे विद्यार्थी
मनपा शाळा क्र.32 मध्ये इ.1ली ते 6 वीपर्यंतचे विद्यार्थी एकाच वर्गात शिक्षण घेत असल्याचे पाहणीअंती निदर्शनास आले.

दरम्यान, पाहणीनंतर निदर्शनास आलेल्या बाबी प्रशासनाला कळविले असल्याचे भाजप गटनेते सुनिल माळी व नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी सांगितले.

खिचडी बेचव
बालवाडीतील विद्यार्थी नियमित यावेत. यासाठी मध्याह भोजन म्हणून खिचडी दिली जाते. भाजपचे गटनेते सुनिल माळी व नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांनी शाळेत जावून खिचडीची तपासणी केली.

तसेच चव घेवून बघतली असता, खिचडी बेचव असल्याचे लक्षात आले. खिचडीत तांदुळ, दाळीचे प्रमाण कमी आणि हळद याव्यतिरिक्त खिचडीत काहीही आढळले नाही.

सुविधांचा अभाव
मनपा शाळा क्र.32 मध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. संरक्षण भिंत तुटलेली आहे. प्रवेशद्वार नाही. दरवाजे, खिडक्या तुटलेले आहेत.

सुरक्षा रक्षक नाहीत. शिक्षक व विद्यार्थ्यांना शौचालयाची व्यवस्था नाही. साफसफाई नाही. शाळेसमोर साचलेल्या पाण्याचा निचरा होत नसल्याने दबकी साचलेली आहे. परिणामी डासांचा प्रार्दुभाव वाढल्यामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

वर्‍हांड्यात बालवाडी
मनपा शाळेच्या शहरात मोठमोठ्यात इमारती आहेत. तरीही देखील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोली नसल्याचे चित्र दिसून आले. सुप्रिम कॉलनीतील बालवाडी अक्षरश: वर्‍हांड्यात भरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

 

LEAVE A REPLY

*