एमजेपी विश्रामगृहाची जागा मनपाच्या ताब्यात

0
जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-काव्यरत्नावली चौकालगत भाऊंचे उद्यानच्या बाजूला असलेले महाराष्ट्र जीवन प्रादीकरणाच्या (एमजेपी) विश्रामगृहाची जागा मनपाने ताब्यात घेतली आहे.
विश्रामगृहाच्या जागेवर सुसज्ज व अद्ययावत ग्रंथालय आणि संगीतमय कारंजा तयार करण्यात येणार असल्याचे माहिती महापौर नितीन लढ्ढा यांनी दिली.

काव्यरत्नावली चोैकालगत जैन उद्योग समूहाने ‘भाऊंचे उद्यान’ विकसीत केले. उद्यानाच्या बाजूलाच महाराष्ट्र जीवन प्रादीकरणचे जुने विश्रामगृह आहे.

विश्रामगृहाची जागा मनपाच्या ताब्यात द्यावी. व जुने बांधकाम पाडण्याची परवानगी द्यावी, यासाठी महापौर नितीन लढ्ढा यांनी पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांना पत्र देवून मागणी केली होती.

त्यानुसार पालकमंत्रीकडून परवानगी मिळाली असून जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांनी महाराष्ट्र जीवन प्रादीकरणचे अधिकारी श्री.निकम व मनपाचे शहर अभियंता सुनिल भोळे यांना जुने बांधकाम पाडण्याबाबत सुचना दिली.

दरम्यान, बांधकाम पाडण्यास सुरुवात झाली असून या जागेवर सुसज्ज ग्रंथालय आणि अत्याधुनिक संगीतमय कारंजा तयार करण्यात येणार असल्याचे महापौर नितीन लढ्ढा यांनी सांगितले.

 

LEAVE A REPLY

*