साफसफाई ठेक्याची चौकशी करुन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

0
जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-महापालिकेने प्रभाग क्र.36 मध्ये साफसफाईचा ठेका दिला आहे. मनपातील अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमताने गैर प्रकाराची व भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करुन संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी नगरसेविका अश्विनी देशमुख यांची जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांना निवेदन दिले.

प्रभाग क्र.36 मध्ये साफसफाईचा ठेका सहजीवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला दिलेला आहे. ठेकेदार साफसफाई न करत असल्याने प्रशासनाकडे तक्रारी केल्या.

मात्र प्रशासनाने ठेकेदारावर कुठलीही कारवाई केली नाही. त्यामुळे संबंधितांची चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी केली.

 

LEAVE A REPLY

*