प्रभाग 36च्या साफसफाई ठेक्याच्या चौकशीसाठी 15 दिवसाचा ‘अल्टीमेटम’

0
जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-मनपा प्रशासनाने साफसफाईसाठी 37 प्रभागांपैकी 18 प्रभागांमध्ये साफसफाईचे ठेके दिले आहेत. प्रभाग क्र.36 महाबळमध्ये ठेकेदारांकडून स्वच्छता होत नसल्याने जवळपास 3500 तक्रारी केल्यात.
तक्रारी थांबविण्यासाठी नगरसेविका, उपायुक्त व आरोग्य अधिकारी यांच्याकडून तडजोड केल्याचा आरोप नगरसेविका अश्विनी व त्यांचे पती विनोद देशमुख यांनी केला आहे.

याप्रकरणी चौकशी अधिकारी बंकापुरे यांच्याकडून चौकशी करुन त्याचा अहवाल 15 दिवसांत सादर करावा, यासाठी महापौर नितीन लढ्ढा यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांना 15 दिवसाची मुदत दिली आहे.

प्रभाग क्र.36 मध्ये साफसफाई होत नसल्याबाबत नगरसेविका अश्विनी देशमुख यांनी मनपाकडे तक्रारी केल्या. तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय चौकशी अधिकारी श्री.बनकापुरे यांनी चौकशी करावी, व त्याचा अहवाल सादर करावा, असा निर्णय महासभेत घेण्यात आला होता. मात्र अद्यापही चौकशी अहवाल दिला नाही.

त्यामुळे महापौर नितीन लढ्ढा यांनी उपायुक्त लक्ष्मीकांत कहार यांना स्मरणपत्र देवून याप्रकरणी सखोल चौकशी करून 15 दिवसांच्या आत अहवालप सादर करावा, आणि चौकशीअंती संबंधीतांवर कठोर कार्यवाही करण्याचा प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात यावा व केलेल्या कार्यवाहीची माहिती सादर करावी, अशी सुचना पत्राद्वारे दिली आहे.

 

LEAVE A REPLY

*