सिटी रन विथ क्रांती साळवी

0
जळगाव । दि.10 । प्रतिनिधी-महिलांमध्ये धावण्यासाठी जनजागृती करण्यासाठी जळगाव रनर्स गृपतर्फे सिटी रन विथ क्रांती साळवी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सुमारे 80 जणांनी सहभागी झाले होते. तसेच महिलांची संख्या लक्षणीय होती.
जळगाव रनर्स गु्रपतर्फे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन धावपटू खान्देशकन्या क्रांती साळवी यांच्या सोबत सिटी रन विथ क्रांती साळवी चे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान सकाळी 6.30 वाजता सागरपार्क येथून रनला सुरुवात करण्यात आली. यामध्ये रनर्स ग्रुपच्या सदस्यांसह शहरातील नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.

रन मध्ये महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग झाल्या असल्याने त्यांची संख्या लक्षणीय होती. रनला सुरुवात करण्याआधी वॉर्मअप व शरीराची स्ट्रेचिंग करण्याची नवीन पद्धतींचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थितांकडून ते करुन घेण्यात आले.

त्यानंतर क्रांती साळवी यांनी प्रत्येकाने दररोज धावले पाहीजे धावणे आरोग्यासाठी कीती अधिक प्रमाणात फायदेशीर असून त्यांचे महत्व विशद करुन त्याबाबत मार्गदर्शन क्रांती साळवी यांनी केले. तसेच रनर्सच्या शंकांचे देखील त्यांनी यावेळी निरसण केले.

असा होता रनचा मार्ग
क्रांती साळवी यांच्या सिटी रन ला सागरपार्क येथून प्रारंभ झाला. त्यानंतर रन काव्यरत्नावली चौक, गणपती मंदिर, महाबळ चौकाकडून पुन्हा काव्यरत्नावली चौक मार्गे सागर पार्क येथे रनचा समारोप झाला.

महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
सिटी रन मध्ये रनर्स ग्रुपचे सद्यस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांनी अधिक संख्येने सहभागी झाल्या असल्याने यामध्ये डॉ.प्रीती अग्रवाल, प्रेमलता सिंग, डॉ.तृप्ती बढे, वेदांती बच्छाव, रुपाली काबरा, पल्लवी भैय्या, डॉ.सीमा पाटील, डॉ. सोनाली कोठावदे, डॉ.सोनाली महाजन, अंकिता कुकरेजा, डॉ.हेमांगीनी कोल्हे, कविता शास्त्री, शारदा कुकरेजा, रोशन राजपूत, वैशाली शाह, डॉ. एकता नीरज अग्रवाल यांच्यासह जळगाव रनर्स ग्रुपचा सर्व सदस्यांनी सहभाग घेतला होता.

 

 

LEAVE A REPLY

*